फोटो सौजन्य - Social Media
देशात इलेक्ट्रिक गाड्यांनी फार बाजार आकसरहित केला आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांकडे आकर्षित आहेत. मग त्या थ्री व्हीलर असो किंवा टू व्हीलर किंवा कमर्शिअल व्हीकल असो इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात मार्केट घेतला आहे. त्यांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. भारतात सध्या फेस्टिव्हल सीजन सुरु होता. देशात एक एक करून अनेक सण उत्सव येऊन गेले. दरम्यान, या दिवसांमध्ये भारतीय जास्त खरेदारी करत असतात. गाड्यांची विक्रीही फार पाहिली जाते. दरम्यान, ग्राहकांनी EV गाड्यांना फार मोठा प्रतिसाद दिला आहे. बॅटरी वर चालणाऱ्या गाडया लोकांच्या पसंतीस येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा मोठा वर्ग EV गाड्यांकडे वळला आहे. गेल्या महिन्यात, विविध सेगमेंटमधील सुमारे 2.18 लाख इलेक्ट्रिक वाहने विकली गेली, ज्यात महिन्या-दर-महिना 36% आणि वार्षिक 55% वाढ दिसून आली आहे.
हे देखील वाचा : जगप्रसिद्ध Toyota Camry चे 2025 मध्ये भारतात होणार लॉंचिग ! कार ग्राहकांना मिळणार आकर्षक पर्याय
ऑक्टोबर महिन्याचा EV Two Wheeler गाड्यांचा परफॉर्मन्स पाहता, गेल्या महिन्यात मासिक रूपाने ५५% विक्री वाढ झाली आहे. गेल्या महिण्यामध्ये १,३९,१५९ EV दुचाक्या विकल्या गेल्या. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही संख्या ७५,१६५ होती. वार्षिक परफॉर्मन्सने पाहिले तर विक्रीत ८५% ने वाढ झाली आहे.
देशामध्ये EV गाड्यांना फार मागणी वाढत आहेत. EV दुचाकींवर भारतीय एक विशेष प्रेम दाखवत आहेत. इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या विक्रीमध्ये ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस, बजाज, एथर एनर्जी आणि हिरो विडा या कंपन्यांनी बाजी मारली आहे.
ऑक्टोबर महिन्याचा EV Three Wheeler गाड्यांचा परफॉर्मन्स पाहता, गेल्या महिन्यात मासिक रूपाने ७% विक्री वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ६७,१७१ EV थ्री व्हीलर विकल्या गेल्या. वार्षिक परफॉर्मन्सने पाहिले तर विक्रीत १८% ने वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ६२,८९९ EV थ्री व्हीलरची विक्री झाली होती.
व्यावसायिक कामासाठी आणि आपल्या व्यवसायाला अधिक मजबुती देण्यासाठी अनेक व्यावसायिक साध्य EV कमर्शिअल वेहिकलच्या दिशेने जात आहेत. वार्षिक वाढ पाहिली तर ५०% इतकी वाढ कमर्शिअल वेहिकलच्या विक्रीत दिसून येत आहे. तर मासिक वाढ १% नी वाढली आहे.
हे देखील वाचा : ‘या’ शुल्लक कारणांमुळे लवकर संपते कारची बॅटरी, तुम्ही नाही करत ना चुका?
इलेट्रीक चारचाकी वाहनांच्या विक्रीतही फार मोठी वाढ दिसून येत आहे. गेल्या महिन्यात या संख्येत १०,६०९ ने वाढ झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही संख्या ७,६२६ इतकी होती. एकंदरीत, या संख्येत वार्षिक वाढ ३९% ने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ५,८७३ EV गाड्यांची विक्री झाली आहे. गेल्या महिन्यातील वाढ पाहाती तर विक्रीत एकूण ८१%ने मासिक वाढ झाली आहे.