फोटो सौजन्य- टोयोटा वेबसाईट
सणासुदीच्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कार उत्पादक कंपन्यांकडून कार लॉंचिंगचा धमाका केला गेला. हॅचबॅक ते एसयुव्ही अशा सर्वच प्रकारांमध्ये नवनवीन कार बाजारात आल्या. या कार्ससोबतच सवलतीच्या चांगल्या ऑफर्सही कंपन्याकंडून दिल्या गेल्या होत्या त्यामुळे कारच्या नव्या मॉडेलसोबत सवलत अशी दुहेरी संधी ग्राहकांना उपलब्ध झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबर या अखेरच्या दोन महिन्यात कंपन्यांकडून वर्षातील शेवटच्या मॉडेल्स लॉंच केल्या जातील. दरम्यान सर्वच कंपन्यांकडून आता तयारी सुरु आहे ती पुढील वर्षांच्या कार लॉंचिगची त्यामध्ये टोयोटा कंपनीकडून ही भारतामध्ये 2025 ला एक विशेष कार लॉंच केली जाणार आहे जाणून घेऊया त्याबद्दल
कंपनीकडून टोयोटा कॅमरी (Toyota Camry) या कारची नवीन जनरेशन 2025 मध्ये भारतात लाँच केली जाईल, असे सुरुवातीला मीडिया रिपोर्ट्नुसार कळते आहे. कारची ही नवीन जनरेशन टोयोटा कॅमरीची नववी जनरेशन असणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही कार 2025 च्या सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. टोयोटा कॅमरीची भारतातील विक्री कमी झाली असली तरी विक्रीमध्ये सातत्यपूर्णता आहे आणि याच कारणामुळे कंपनी भारतात सेडानचे नवीन मॉडेल सादर करणार आहे.
2025 च्या भारत मोबिलिटी शोमध्ये कंपनी नवीन टोयोटा कॅमरी प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. ही कार भारतात तिच्या जुन्या मॉडेलप्रमाणे असेंबल केली जाणार आहे आणि ती हायब्रीड असेल. याचा अर्थ कॅमरीही उत्तम इंधन कार्यक्षमता तसेच बॅकसीट कम्फर्टही देणार आहे.
टोयोटा कॅमरी इंजिन आणि इतर घटक (Toyota Camry)
टोयोटा कॅमरीची नवीन जनरेशन टीएनजीए-के प्लॅटफॉर्मसह ऑफर केली गेली आहे आणि हुड अंतर्गत मूलभूत हार्डवेअर पूर्वीप्रमाणेच आहे. सेडानमधील पॉवर इंजिन आणि स्ट्राँग-हायब्रिड मिळून 227hp आहे. कारची इंधन कार्यक्षमता सुमारे 25kmpl असल्याचा दावा केला जातो. कारची बूट स्पेस तब्बल 427 लीटर आहे. त्यामुळे कारच्या मागे खूप जागा मिळते.
टोयोटा कॅमरी डिझाईन (Toyota Camry)
टोयोटा कॅमरी सेडान कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन कॅमरी ही लांब असली तरीही त्याच व्हीलबेससह आहे. कारचे काही डिझाइन घटक लेक्ससच्या डिझाइनसह समानता देतात. समोरच्या दोन्ही हेडलाइट्समध्ये अरुंद स्लॉट सारखी ‘ग्रिल’ असते. हेडलाइट पॉड्स आकारात कॉम्पॅक्ट असणार आहेत तर LED लाईट्स अधिक कार्यक्षमता जोडतात. मागील बाजूस, टेल-लाइट सी-आकाराचे आहेत ज्यामुळे कारमध्ये एक नवीन आणि फ्रेश लुक येतो.
कारच्या किंमतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास टोयोटा कॅमरी सेडानची एक्स शोरुम किंमत ही सुमारे 47-50 लाख रुपये असणार आहे. हायरेंज सेडान मॉडलमध्ये ग्राहकांना या कारमुळे एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.