फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार चालवणे हे प्रत्येक मध्यम व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न अनेक खरे सुद्धा करून दाखवतात. पण जेव्हा कारला मेंटेन ठेवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही खरे कार मालक होतात. कार नवीन असताताना ती सहसा एवढा त्रास देत नाही पण जसजसा वेळ जातो, तसतसा कारमध्ये अनेक समस्या दिसू लागतात. काही वेळेस तर या समस्यांचे कारण आपल्या स्वतःच्या कृती असतात. यातीलच एक समस्या म्हणजे कारची बॅटरी लवकर संपणे.
कारची बॅटरी लवकर संपण्याची अनेक कारणे असू शकतात. आज आपण 5 सामान्य कारणे जाणून घेणार ज्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. यापैकी काही कारणे रोजच्या चुकांशी संबंधित आहेत, ज्या थोडे लक्ष देऊन सुधारता येतील.
अनेक वेळा कारचे हेडलाइट्स, डोम लाइट्स किंवा इतर लाइट्स चुकून ऑन करून सोडले जातात. यामुळे कारची बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होते, विशेषतः जेव्हा कार बंद असते. आजकाल काही कारमध्ये ऑटोमॅटिक लाइट-ऑफ फिचर आले आहे, परंतु तसे नसल्यास, आपण नेहमी कार हेडलाईट बंद आहेत की चालू हे तपासले पाहिजेत.
जर कार बराच वेळ बंद असेल किंवा नियमितपणे चालवली जात नसेल, तर बॅटरी चार्ज होऊ शकत नाही. यामुळे बॅटरीचा चार्ज हळूहळू निघून जातो. हे टाळण्यासाठी वेळोवेळी काही काळ कार सुरू ठेवावी.
म्युझिक सिस्टीम, चार्जर, नेव्हिगेशन सिस्टीम आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसारख्या अत्याधिक ॲक्सेसरीज बॅटरीवर अतिरिक्त भार टाकू शकतात. कारचे इंजिन बंद असल्यावर जर ही उपकरणे सुरू असेल तर बॅटरी लवकर संपू शकते.
साधारणपणे कारची बॅटरी तीन ते पाच वर्षे टिकते, त्यानंतर तिची क्षमता कमी होऊ लागते. जुन्या बॅटरी लवकर डिस्चार्ज होतात आणि त्वरीत खराब सुद्धा होऊ शकतात, विशेषतः थंड हवामानात. ही समस्या उद्भवू नये म्हणून वेळेवर बॅटरी बदलणे महत्वाचे आहे.
बॅटरीचे कनेक्शन ढीले असल्यास किंवा टर्मिनल्सवर गंज असल्यास, बॅटरी योग्यरित्या चार्ज होऊ शकत नाही. यामुळे बॅटरी लवकर संपू शकते. यासाठी बॅटरी टर्मिनल्स वेळोवेळी तपासल्या पाहिजेत आणि स्वच्छ केल्या पाहिजेत.
या समस्या टाळण्यासाठी, बॅटरीची नेहमी देखभाल करा, कार वेळेवर सर्व्हिसिंग करा आणि वर नमूद केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा.