Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागील 5 वर्षात EV ची रेकॉर्डब्रेक विक्री, ‘या’ राज्यात सर्वाधिक मागणी

देशात इलेक्ट्रिक वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आता गेल्या पाच वर्षात देशात इलेक्ट्रिक वाहनांची किती विक्री झाली आहे, याबद्दलची माहिती मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 16, 2024 | 04:45 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. त्यात आता ज्या कंपन्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार्स उत्पादित करत होत्या त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर सुद्धा भर देत आहे. यावरून एक गोष्ट नक्कीच समजते की येणारा काळ हा नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे.

ICE वाहनांच्या तुलनेत भारतात ईव्हीची विक्री जोर धरू लागली आहे. लोकांना हा विभागही आवडताना दिसत आहे. हे पाहता वाहन उत्पादकांकडून उत्कृष्ट फीचर्ससह नवीन ईव्ही आणल्या जात आहेत. पण तुम्हला कधी प्रश्न पडला आहे का की देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री किती होत असेल. याचे उत्तर आता केंद्र सरकारने दिले आहे.

एप्रिल 2019 ते मार्च 2024 दरम्यान देशभरात किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया, ईव्ही विक्रीच्या बाबतीत टॉप-5 मध्ये कोणत्या राज्यांचा समावेश आहे?

इलेक्ट्रिक वाहनांची किती झाली विक्री?

एप्रिल 2019 ते मार्च 2024 या पाच वर्षांत किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. यासोबतच या कालावधीत देशातील कोणत्या राज्यांमध्ये किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याचीही माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, या कालावधीत देशभरात ईव्हीच्या एकूण 36,39,617 युनिट्सची विक्री झाली आहे.

Top-5 मध्ये या राज्यांचा समावेश

  • यूपी, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक ईव्हीची विक्री झाली आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2024 दरम्यान उत्तर प्रदेशात ईव्हीच्या 665247 युनिट्सची नोंदणी झाली आहे.
  • महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे EV च्या 439358 युनिट्सची नोंदणी झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर, कर्नाटकमध्ये 350810 युनिट्सची नोंदणी झाली आहे. यानंतर
  • यानंतर तामिळनाडू येतो जेथे 228850 युनिट्सची नोंदणी झाली आहे.
  • राजस्थान 233503 युनिट्सच्या नोंदणीसह टॉप-5 यादीत पाचव्या स्थानावर आहे.
  • या यादीत दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. या कालावधीत दिल्लीत एकूण 216084 युनिट्सची नोंदणी झाली आहे.

या राज्यांमध्ये सर्वात कमी विक्री

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2024 दरम्यान सिक्कीममध्ये एकाही इलेक्ट्रिक वाहनाची रजिस्ट्रेशन झालेली नाही. याशिवाय लक्षद्वीपमध्ये 19, नागालँडमध्ये 27, अरुणाचल प्रदेशमध्ये 42, लडाखमध्ये 88, अंदमान आणि निकोबारमध्ये 191, दादर नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 468, मिझोराममध्ये 344, मेघालयमध्ये 572, मणिपूरमध्ये 1273, हिमाचल प्रदेशमध्ये 3043, पुडुचेरी मधील 5933 युनिट्सची नोंदणी झाली आहे.

Web Title: Electric vehicle sales report from april 2019 to march 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

MG कारचा सर्वात मोठा खेळ! Windsor EV च्या किमतीत मोठी वाढ, आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार
1

MG कारचा सर्वात मोठा खेळ! Windsor EV च्या किमतीत मोठी वाढ, आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज
2

‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज

इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे पडत आहेत आजारी? काय आहे कारण? नक्की वाचा
3

इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे पडत आहेत आजारी? काय आहे कारण? नक्की वाचा

खूप झाले इलेक्ट्रिक कार, बाईक, स्कूटर ! आता मार्केटमध्ये Electric Auto, मिळणार 200 KM ची रेंज
4

खूप झाले इलेक्ट्रिक कार, बाईक, स्कूटर ! आता मार्केटमध्ये Electric Auto, मिळणार 200 KM ची रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.