Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँपिअर इलेक्ट्रिकची विक्री 7 महिन्यांत 70 हजार पार! 2026 च्या आर्थिक वर्षात संपूर्ण विक्रीचा विक्रम मोडला

Ampere Electric Sales ने FY27 च्या पहिल्या 7 महिन्यांतच 70,333 स्कूटर्सची नोंदणी करत मागच्या संपूर्ण वर्षाचा विक्रम मोडला आहे. विक्रीत 93 टक्क्यांची वाढ नोंदवणाऱ्या कंपनीची Nexus EX+ स्कूटर आणि आगामी इलेक्ट्रिक बाईकही चर्चेत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 18, 2026 | 05:16 PM
Ampere Electric Scooter Sales Cross 70,000 Units (फोटो सौजन्य-AI एआय)

Ampere Electric Scooter Sales Cross 70,000 Units (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • अँपिअर इलेक्ट्रिकने FY27 च्या पहिल्या 7 महिन्यांत 70,333 स्कूटर्सची नोंदणी करत विक्रीचा नवा टप्पा गाठला.
  • कंपनीच्या विक्रीत 93 टक्क्यांची वाढ झाली असून भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये 5.7 टक्के वाटा मिळाला.
  • Nexus EX+ मध्ये 3kWh बॅटरी, 136Km रेंज आणि Intellipack मधील 30 पेक्षा जास्त स्मार्ट फीचर्स आहेत.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये Ampere Electric ने मोठी मजल मारली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2027  मधील पहिल्या 7 महिन्यांतच मागच्या पूर्ण आर्थिक वर्षातील विक्रीचा आकडा पार केला आहे. Ampere EV Sales च्या Vahan पोर्टलवरील आकडेवारीनुसार, 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत कंपनीच्या 70,333 इलेक्ट्रिक स्कूटर्सची नोंदणी झाली आहे. FY26 मध्ये संपूर्ण वर्षभरात हा आकडा 61,842 होता. त्यामुळे Ampere Electric Scooters ची भारतीय कस्टमर्समध्ये लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येते.

विक्रीत 93 टक्क्यांची वाढ

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या अँपिअरने यंदा 93 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत FY26 मध्ये कंपनीच्या 36,452 स्कूटर्सची नोंदणी झाली होती. यंदा त्याच कालावधीत 70,333 नोंदणी झाल्याने कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या

या आकडेवारीसह अँपिअर भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या लिस्टमध्ये टीव्हीएस, बजाज, एथर आणि हिरो विडा या कंपन्या तिच्या पुढे आहेत. 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये अँपिअरचा वाटा 5.7 टक्के होता.

Nexus EX+ मध्ये 136Km रेंज

अँपिअरच्या सध्याच्या EV पोर्टफोलिओमध्ये नेक्सस EX+, मॅग्नस GMax, मॅग्नस निओ आणि रिओ Vyb या स्कूटर्सचा समावेश आहे. नुकतीच कंपनीने Ampere Nexus EX+ भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. तिच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत ₹1.30 लाख आहे. तर IoT आधारित Intellipack साठी ₹6,000 जास्त मोजावे लागतात. त्यामुळे या व्हेरिएंटची एकूण किंमत ₹1.36 लाख होते.

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!

या स्कूटरमध्ये 3kWh LFP बॅटरी आणि ड्युअल-फ्रेम स्टील चेसिस देण्यात आले आहे. एका चार्जमध्ये 136Km रेंज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. Carbon Knight आणि Steel Grey अशा 2 रंगांमध्ये ती मिळते. Intellipack मध्ये 30 पेक्षा जास्त स्मार्ट फीचर्स असून लाइव्ह ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग, नेव्हिगेशन आणि बॅटरी हेल्थ स्कोअर यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक बाईक आणण्याचीही तयारी

अँपिअरने मॅग्नस GMax Intellipack स्कूटरद्वारे 15 दिवसांत 4,000Km पेक्षा जास्त अंतराची Ultimate Endurance Ride पूर्ण केली आहे. हा प्रवास अरुणाचल प्रदेशातील डोंग व्हॅलीपासून गुजरातमधील गुहार मोतीपर्यंत झाला.

कंपनी आता इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्येही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अँपिअर Xyber कॉन्सेप्टचे डिझाइन पेटंट भारतात दाखल करण्यात आले आहे. या बाईकचे प्रोडक्शन मॉडेल 2027 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर होण्याची शक्यता आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

Web Title: Ampere electric sales 70 thousand scooters fy27 growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या
1

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!
2

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण
3

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर
4

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.