
फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय बाजारात अनेक लोकप्रिय एसयूव्ही आहेत. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Hyundai Exter CNG. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सात वर्षांसाठी दरमहा किती ईएमआय द्यावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ
ह्युंदाई एक्सस्टरची सीएनजी व्हर्जनची किंमत 6.87 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला अंदाजे 62000 नोंदणी शुल्क आणि अंदाजे 42000 रुपयांचा इंश्युरन्स भरावा लागेल. यामुळे ऑन-रोड किंमत 7.91 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
जर तुम्ही Hyundai Exter CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून या कारच्या एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत जर तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट भरले, तर उर्वरित सुमारे 6.91 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील.
बँकेने जर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 6.91 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा सुमारे 11,131 रुपयांचा EMI भरावी लागेल.
एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.91 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले, तर सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही दरमहा 11,131 रुपयांचा EMI भराल. यामुळे एकूण सुमारे 2.43 लाख रुपये व्याज तुम्हाला भरावा लागेल.
अशा प्रकारे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा विचार करता, Hyundai Exter CNG व्हेरिएंटची एकूण किंमत सुमारे 10.34 लाख रुपये इतकी पडेल.
ह्युंदाईने एक्स्टर जिथे ती Maruti Fronx, Kia Sonet, Tata Nexon,Renault Kiger, आणि Nissan Magnite सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.