फोटो सौजन्य: iStock
एमजी मोटर्सने भारतात दमदार कार ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये तर Comet EV आणि Windsor EV ला चांगली मागणी मिळतेय. मात्र, आता कंपनी येत्या नवीन वर्षात त्यांच्या कार्सच्या किमतीत वाढ करणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या कारच्या किमती कधी वाढवल्या जाणार आहेत.
एमजी मोटर्स येत्या नवीन वर्षात त्यांच्या कार्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. नेमकी ही किंमतवाढ का केली जात आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
एमजी मोटर्स भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. नुकतेच कंपनीने माहिती दिली आहे की ते त्यांच्या कारच्या किमतीत मोठी वाढ करणार आहे. कंपनी 2026 पासून त्यांच्या कार्सच्या किमती वाढवणार आहे.
एमजीने नवीन वर्षापासून त्यांच्या कारच्या किमती दोन टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही वाढ सर्व व्हेरिएंटमध्ये एकसारखी नसेल. अलीकडेच कंपनीने त्यांची नवीन हेक्टर लाँच केली आहे. त्यामुळे या एसयूव्हीची किंमत वाढवली जाणार नाही. त्याच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत देखील अद्याप पब्लिश केलेली नाही.
एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार
दरवर्षी नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवतात. एमजीने अलीकडेच किंमत वाढ जाहीर केली आहे.
एमजी भारतीय बाजारात आयसीईपासून ते ईव्ही सेगमेंटपर्यंत विविध प्रकारच्या कार ऑफर करतात. कंपनी MG Comet EV, ZS EV, Windsor EV, Hector, आणि Gloster सारख्या कार ऑफर करते.
वाढत्या इनपुट खर्चामुळे आणि इतर आर्थिक घटकांमुळे नवीन वर्षापासून किंमत वाढ लागू केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.






