Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशन लाँच; नवीन ड्युअल-टोन रंगांसह किंमत फक्त 76,400 रुपये!

हिरो डेस्टिनी 110 ला मिळाला नवा क्लासिक अवतार! 76,400 रुपयांच्या या स्कूटरमध्ये दोन नवीन ड्युअल-टोन रंग, रेट्रो लूक आणि खास कॉस्मेटिक अपडेट्स मिळतात. पण इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 31, 2026 | 02:18 PM
हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशन लाँच; नवीन ड्युअल-टोन रंगांसह किंमत फक्त 76,400 रुपये!
Follow Us
Follow Us:
  • हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशन भारतात 76,400 रुपये एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे.
  • नवीन एडिशनमध्ये दोन ड्युअल-टोन रंग, 3D बॅज आणि खास ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
  •  110cc इंजिनसह 8.5 PS पॉवर, 8.7 Nm टॉर्क आणि 19 लिटर स्टोरेज मिळते.
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय फॅमिली स्कूटर डेस्टिनी 110 चे नवीन क्लासिक एडिशन भारतीय मार्केटमध्ये  लाँच केले आहे. या नवीन एडिशनमध्ये निओ-रेट्रो स्टाइलिंगचा टच देण्यात आला असून, दोन नवीन ड्युअल-टोन कलर ऑप्शन, फ्रेश ग्राफिक्स आणि खास कॉस्मेटिक अपडेट्स मिळतात. या स्कूटरची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 76,400 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या डीलरशिपवर ही स्कूटर अव्हेलेबल आहे.

नवीन हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशनमध्ये मॅट गोल्डफिश सिल्व्हर विथ लाइट इंडस्ट्रियल ग्रे आणि मॅट एरिस ब्राउन असे दोन रंग मिळतात. पहिल्या रंगासोबत ब्राउन इनर पॅनल्स देण्यात आले आहेत, तर दुसऱ्या रंगात ब्लॅक इनर पॅनल्स मिळतात. याशिवाय फ्रंट हँडल कव्हर आणि साइड पॅनल्सवर नवीन स्ट्राइप्स, रंगाशी जुळणारे मिरर, सीट आणि इनर पॅनल्स देण्यात आले आहेत. क्लासिक एडिशनची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी 3D बॅज आणि ब्रँडेड रिम टेपचाही समावेश करण्यात आला आहे. हे सर्व बदल केवळ डिझाइनपुरते असून इंजिन किंवा मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्कूटरमध्ये पूर्वीप्रमाणेच 110cc इंजिन मिळते. हे इंजिन 8.5 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत हिरोचे i3S टेक्नोलॉजी देण्यात आले आहे. स्कूटर काही वेळ थांबलेली असताना हे सिस्टम इंजिन आपोआप बंद करते आणि थ्रॉटल दिल्यानंतर पुन्हा सुरू करते. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अनावश्यक इंधन वापर कमी करण्यास मदत होते. यामध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED टेललॅम्प, पोझिशन लॅम्प, डिजिटल-अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि अलॉय व्हील्स मिळतात.

कुटुंबासाठी स्कूटर खरेदी करणाऱ्यांच्या सोयीसाठी यात 785mm लांबीची सीट देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात लांब सीट आहे. पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना 12-इंच व्हील्स असून मागच्या बाजूला 100/80-12 टायर मिळतो. सामान ठेवण्यासाठी 19 लिटरची अंडर-सीट स्टोरेज स्पेस, फ्रंट स्टोरेज कंपार्टमेंट, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि बूट लॅम्प देण्यात आला आहे.

भारतीय मार्केटमध्ये या स्कूटरची स्पर्धा होंडा अ‍ॅक्टिव्हा 110 आणि टीव्हीएस ज्युपिटर 110 यांच्याशी होईल. तसेच सुजुकी अ‍ॅक्सेस 125 हा देखील खरेदीदारांसाठी ऑप्शन आहे. नवीन रंगसंगती आणि क्लासिक लूकमुळे डेस्टिनी 110 आता फॅमिली स्कूटर सेगमेंटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशनची किंमत किती आहे?

उत्तर: हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशनची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 76,400 रुपये आहे.

प्रश्न 2: नवीन डेस्टिनी 110 क्लासिक एडिशनमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?

उत्तर: या एडिशनमध्ये दोन नवीन ड्युअल-टोन रंग, नवीन ग्राफिक्स, 3D क्लासिक बॅज, ब्रँडेड रिम टेप आणि रंगाशी जुळणारे मिरर व सीट देण्यात आली आहे.

प्रश्न 3: हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशनमध्ये कोणते इंजिन मिळते?

उत्तर: यात 110cc इंजिन असून ते 8.5 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत i3S टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

Web Title: Hero destini 110 classique edition launched india price auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • automobile
  • Hero MotoCorp
  • scooter

संबंधित बातम्या

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे
1

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता
2

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता

दिवाळी मध्ये या 5 कॉम्पॅक्ट SUV वर मिळवा 90,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! फटाफट पाहा आणि चटाचट घेऊन टाका
3

दिवाळी मध्ये या 5 कॉम्पॅक्ट SUV वर मिळवा 90,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! फटाफट पाहा आणि चटाचट घेऊन टाका

एथर कोनार्कची दिल्लीमध्ये एका दिवसात 500 इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी! जाणून घ्या सविस्तरपणे
4

एथर कोनार्कची दिल्लीमध्ये एका दिवसात 500 इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.