फोटो सौजन्य:@91wheels (X.com)
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय HF सिरीजमधील नवीन बाईक HF Deluxe Pro भारतात सादर केली आहे. ही बाइक ‘नये इंडियन की डिलक्स बाइक’ या संकल्पनेखाली लाँच करण्यात आली असून ती आत्मविश्वासू, प्रगतीशील भारतीयांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.
HF Deluxe Pro ही बाइक विश्वासार्हता, इंधन कार्यक्षमता आणि डिझाइनच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय आहे. ही बाईक केवळ एंट्री-लेव्हल मोटरसायकल नसून, तिच्यात प्रगत फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि उच्च दर्जाचं मायलेज देणारी कार्यक्षमता आहे.
ही बाईक ₹73,550 (एक्स-शोरूम, दिल्ली) या किमतीत देशभरातील हिरो डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.
ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये Nissan Magnite फुल्ल मार्कसह पास, किती मिळाली रेटिंग?
HF Deluxe Pro मध्ये आकर्षक नवीन बॉडी ग्राफिक्स आहेत, जे बाइकच्या एकूण लुकमध्ये गतिशीलता आणतात. सेगमेंट-फर्स्ट एलईडी हेडलॅम्प, मुकूटाच्या आकारातील उच्च प्रखर पोझिशन लॅम्प आणि प्रीमियम क्रोम अॅक्सेंट्स बाइकला स्टायलिश आणि आधुनिक लुक देतात.
ही बाईक नवीन होरायझन डिजिटल स्पीडोमीटरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये लो फ्युएल इंडिकेटर (LFI) सारखी वैशिष्ट्ये आहेत. हे रायडरला इंधनाची अचूक माहिती देत प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.
HF Deluxe Pro मध्ये १८ इंचांचे मोठे व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत जे अधिक स्थिर आणि आरामदायी राइड देतात. १३० मिमी ड्रम ब्रेक्स आणि २-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन मुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम हाताळणी आणि ब्रेकिंग कार्यक्षमता मिळते.
वाहतूक पोलिसांना Saiyaara ची भुरळ! खास चेतावणी देत म्हटलं, “अन्यथा तुमचं प्रेम ही अर्धवट राहील…”
ही बाइक ९७.२ सीसीच्या विश्वासार्ह इंजिनसह येते, जे ७.९ BHP (8000 RPM) आणि ८.०५ Nm टॉर्क (6000 RPM) निर्माण करते. यामध्ये i3S (Idle Stop-Start System), लो-फ्रिक्शन इंजिन आणि Low Rolling Resistance Tyres असल्याने उत्तम मायलेज आणि सहज अॅक्सेलेरेशनचा अनुभव मिळतो.
हिरो मोटोकॉर्पचे आशुतोष वर्मा, (मुख्य व्यवसाय अधिकारी – इंडिया बिझनेस युनिट) म्हणाले, “HF Deluxe ही लाखो भारतीयांची विश्वासार्ह साथ ठरली आहे. नवीन HF Deluxe Pro मधील आकर्षक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट मायलेज आधुनिक भारतीय रायडरच्या गरजांसाठी आदर्श आहेत.”