Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

भारतीय ऑटो बाजारात MG Majestor सादर करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीची अजून एक एसयूव्ही लोकप्रिय आहे. ती म्हणजे MG Gloster. मात्र, दोन्ही एसयूव्हीमध्ये फरक काय? जाणून घ्या

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात MG Majestor ही नवीन एसयूव्ही सादर
  • MG Gloster देखील एक चांगली एसयूव्ही
  • जाणून घ्या दोन्ही एसयूव्हीमध्ये किती फरक?
ब्रिटिश ऑटो कंपनी MG Motors ने भारतात विविध सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने SUV सेगमेंटमध्ये त्यांची नवीन कार MG Majestor सादर केली आहे. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देणार आहे. याशिवाय एमजी मोटर्सची अजून एक एसयूव्ही लोकप्रिय आहे. ती म्हणजे MG Gloster.

MG Majestor पहिल्यांदा ऑटो एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. मात्र, या लाँचमध्ये तिच्या डिझाइन आणि फीचर्सबद्दल अधिक तपशीलवार माहिती दिली आहे. किंमत एप्रिल 2026 मध्ये जाहीर केली जाईल आणि डिलिव्हरी मे मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. Majestor ग्लोस्टरपेक्षा कशी वेगळी आहे ते जाणून घेऊयात.

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

रिअर स्टाइलिंग

मागील बाजूस मॅजेस्टरमध्ये कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहेत, जे ग्लॉस्टरमधील स्वतंत्र युनिट्सपेक्षा वेगळे आहेत. एमजी बॅजऐवजी “Morris Garages” अशी अक्षरे देण्यात आली आहेत. बंपरवर अतिरिक्त क्लॅडिंग देण्यात आली असून ग्लॉस्टरच्या क्वाड एग्झॉस्टऐवजी ड्युअल एग्झॉस्ट टिप्स देण्यात आल्या आहेत. दोन्ही एसयूव्हीचा व्हीलबेस समान आहे.

साइड प्रोफाइल

साइड प्रोफाइलमध्ये एकूण डिझाइन ओळखीचे असले तरी मॅजेस्टरमध्ये नव्याने डिझाइन केलेले 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच व्हील आर्च आणि सिल्ल्सवर काळ्या रंगाची फिनिश देण्यात आली आहे, ज्यामुळे तिचा मजबूत आणि रग्ड लुक अधिक उठून दिसतो.

इंटीरियर आणि फीचर्स

इंटीरियरमध्ये मॅजेस्टरला सिंगल-टोन ब्लॅक थीम आणि सिल्व्हर हायलाइट्ससह नवीन केबिन लेआउट देण्यात आला आहे, जो ग्लॉस्टरच्या ब्लॅक-ब्राउन फिनिशपेक्षा वेगळा आहे. यात 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पूर्णपणे डिजिटल 12.3 इंच इंस्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. ए-पिलर आणि सेंटर कन्सोलवर ग्रॅब हँडल्स देण्यात आले असून गिअर लीव्हर स्टीयरिंग कॉलमवर शिफ्ट करण्यात आला आहे. 6 आणि 7-सीटर असे दोन्ही सीटिंग पर्याय उपलब्ध आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

मॅजेस्टरमध्ये ग्लॉस्टरमधील 2.0 लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे, मात्र त्यात अधिक सुधारणा करण्यात आली आहे. हे इंजिन 215 हॉर्सपॉवर आणि 478 एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला असून 4×2 आणि 4×4 दोन्ही ड्राइव्ह पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे, ग्लॉस्टरमध्ये 161 हॉर्सपॉवर आणि 374 एनएम टॉर्क निर्माण करणारा कमी स्पेसिफिकेशनचा 2.0 लिटर टर्बो-डिझेल पर्यायही उपलब्ध आहे.

Web Title: Mg majestor vs mg gloster know the exact difference between both the models

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • MG
  • SUV

संबंधित बातम्या

Royal Enfield Classic 350 गोरखा एडिशन १८ ऑगस्टला लाँच होणार! जाणून घ्या सगळ्या डिटेल्स
1

Royal Enfield Classic 350 गोरखा एडिशन १८ ऑगस्टला लाँच होणार! जाणून घ्या सगळ्या डिटेल्स

किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!
2

किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ
3

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ

PM E Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकींसाठीची ‘पीएम ई-ड्राईव्ह योजना’ ३१ मार्च २०२८ पर्यंत वाढवली! जाणून घ्या सविस्तरपणे
4

PM E Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकींसाठीची ‘पीएम ई-ड्राईव्ह योजना’ ३१ मार्च २०२८ पर्यंत वाढवली! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.