
फोटो सौजन्य: Pinterest
हिरो स्प्लेंडर प्लस ही भारतीय दुचाकी बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक आहे. या बाईकला गेल्या अनेक वर्षांपासून दमदार मागणी मिळत आहे. त्यात GST कपातीनंतर या बाईकची किंमत कमी करण्यात आली आहे. यामुळे हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरूम किंमत 73,902 रुपयांपासून सुरू होते आणि 76,437 रुपयांपर्यंत जाते. स्प्लेंडर प्लसचे चार व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करण्यासाठी, तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दरमहा निश्चित रक्कम ईएमआय म्हणून देऊन ही बाईक खरेदी करू शकता. ही बाईक खरेदी करण्यासाठी, तुमच्याकडे 9,000 रुपयांचे डाउन पेमेंट म्हणून असणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुम्ही 4 किंवा 5 वर्षांसाठी ईएमआयबद्दलची प्लॅनिंग करू शकता.
जर तुम्ही हिरो स्प्लेंडर प्लससाठी 2 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला एकूण 86,688 रुपये भरावे लागतील. या कर्जासाठी तुम्हाला 9% व्याजदराने 24 महिन्यांसाठी 3,612 रुपयांचा EMI द्यावा लागेल. यामुळे दोन वर्षांच्या बाईक लोनवर तुम्हाला 7,631 रुपयांचा व्याज भरावा लागेल.
काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या
हिरो स्प्लेंडर प्लसचे स्टॅंडर्ड मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 79,057 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही 9% व्याजदराने 3 वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 36 महिन्यांसाठी दरमहा 2,514 जमा करावे लागतील. यामुळे पुढील तीन वर्षांत एकूण 90,504 जमा होतील, ज्यापैकी 11,447 रुपये व्याज असेल.
जर तुम्ही ही हिरो बाईक 4 वर्षांच्या कर्जावर खरेदी केली तर 9% व्याजदरामुळे तुम्हाला सुमारे 2000 रुपयांचा चा मासिक EMI भरावा लागेल. तसेच या चार वर्षात तुम्हाला 15,359 रुपयांचा व्याज द्यावा लागेल.