फोटो सौजन्य: istock
Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
आता Tesla ने 2025 मधील न विकल्या गेलेल्या काही Model Y युनिट्सवर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. ही सूट स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट वर देण्यात येत असून, सवलतीनंतर त्याची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही ऑफर सर्व कारसाठी लागू नसून, फक्त इन्व्हेंटरीमध्ये शिल्लक राहिलेल्या युनिट्सपुरताच मर्यादित आहे.
डिसेंबर महिन्यात Tesla भारतात केवळ 68 युनिट्सची विक्री करू शकली, जी BYD आणि BMW सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. संपूर्ण कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये Tesla ची एकूण विक्री 200 युनिट्सच्या थोडीशी पुढे गेली. सुरुवातीला Tesla ला चांगला प्रतिसाद आणि बुकिंग मिळाले होते, मात्र जास्त किंमतीमुळे अनेक ग्राहकांनी आपली बुकिंग रद्द केली.
भारतात Tesla Model Y ला BMW iX1 LWB आणि BYD Sealion 7 सारख्या इलेक्ट्रिक SUV कडून कडवी स्पर्धा मिळत आहे. या दोन्ही कार्स तुलनेने कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यातच Tesla चे एक्सपीरियन्स सेंटर्स आणि शोरूम्स सध्या मर्यादित संख्येत आहेत. मात्र कंपनी हळूहळू आपले नेटवर्क वाढवत असून, त्यामुळे येत्या काळात विक्रीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
Tesla Model Y चालवून पाहिल्यानंतर बहुतांश ग्राहक तिच्या परफॉर्मन्स, प्रगत टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हिंग क्वालिटीने प्रभावित होतात. तरीही भारतीय बाजाराच्या दृष्टीने तिची किंमत जास्त असल्याचे मानले जाते, विशेषतः जेव्हा त्याच सेगमेंटमध्ये अधिक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत.
Lamborghini India चे माजी CEO शरद अग्रवाल यांनी Tesla च्या भारतातील ऑपरेशन्सची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, कंपनीकडून रणनीतीत बदल अपेक्षित आहेत. भारतीय बाजारात यश मिळवण्यासाठी Tesla ला नवीन मॉडेल्स सादर करणे, लोकल असेंब्ली सुरू करणे किंवा किंमतीत कपात करण्यासारख्या पर्यायांवर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.






