
फोटो सौजन्य: Pinterest
अहवालांनुसार Honda City 2026 चा डिझाइन कंपनीच्या जागतिक मॉडेल्सवर आधारित असेल. यामध्ये Honda Civic ची झलक पाहायला मिळू शकते. फ्रंट प्रोफाइलमध्ये नवीन क्रोम ग्रिल, शार्प LED हेडलॅम्प्स आणि डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs) देण्यात येतील. बंपर अधिक स्पोर्टी डिझाइनसह सादर केला जाईल. साइड प्रोफाइलमध्ये नवे 16-इंच अलॉय व्हील्स या कारला अधिक प्रीमियम लूक देतील. इंटिरिअरमध्ये उत्तम दर्जाचे मटीरियल, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड आणि लेदर सीट्स मिळण्याची शक्यता आहे.
Suzuki Access 125 vs Hero Destini 125: तुमच्यासाठी पैसे वसूल स्कूटर कोणती? चला जाणून घेऊयात
नव्या Honda City 2026 मध्ये मोठा 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात येऊ शकतो, ज्यामध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट मिळेल. याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, पुश-बटन स्टार्ट, सनरूफ आणि रियर AC व्हेंट्स यांसारखी फीचर्सही मिळतील. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही सेडान आणखी प्रगत असेल.
Honda City ही नेहमीच सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. 2026 मॉडेल मध्येही Honda Sensing टेक्नॉलॉजी देण्यात येणार असून, त्यामध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम आणि विविध रोड सेफ्टी फीचर्सचा समावेश असेल. यासोबतच 6 एअरबॅग्स, ABS, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखी आवश्यक सेफ्टी फीचर्सही मिळतील.
Renault साठी ‘ही’ कार ठरली भाग्यवान! झटपट बनली लोकप्रिय, विक्रीत 56 टक्के वाटा
Honda City 2026 मध्ये पेट्रोल आणि हायब्रिड असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. हायब्रिड व्हेरिएंट सुमारे 27 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतो, ज्यामुळे ही कार आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक किफायतशीर पर्यायांपैकी एक ठरू शकते.