Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda कडून देशात ‘E-Gurukul’ हा डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्‍लॅटफॉर्म लाँच

होंडा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमात्त कार्स लाँच करत असते. परंतु आता कंपनीने आपला नवीन डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्‍लॅटफॉर्म 'E-Gurukul' लाँच केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2024 | 05:04 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाने आपला नाविन्‍यपूर्ण डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्‍लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. याप्रसंगी रस्‍ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. हा उपक्रम भारतातील रस्‍ता सुरक्षिततेच्‍या संस्‍कृतीला चालना देण्‍याप्रती एचएमएसआयच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ई-गुरुकुल नेमके आहे तरी काय? चला याबद्दल जाणून घेऊया.

ई-गुरूकुल प्‍लॅटफॉर्म तीन विशिष्‍ट वयोगटांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले प्रशिक्षण मॉड्यूल्‍स देतो, ज्‍यामधून रस्‍ता सुरक्षा शिक्षणाप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनाची खात्री मिळते.

५ ते ८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल
९ ते १५ वर्ष वयोगटासाठी: ९-मिनिट मॉड्यूल
१६ ते १८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल

सध्‍या, मॉड्यूल्‍स कन्‍नड, मल्‍याळम, हिंदी, तेलुगु, तमिळ व इंग्रजी अशा विविध भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहेत, ज्‍यामधून सर्वसमावेशकता व प्रादेशिक प्रासंगिकतेची खात्री मिळते. ई-गुरूकुल egurukul.honda.hmsi.in येथे उपलब्‍ध होऊ शकते. प्‍लॅटफार्म प्रथम श्रेणीच्‍या शहरांसाठी लाइव्‍ह स्ट्रिमिंग, द्वितीय श्रेणीच्‍या शहरांसाठी डाऊनलोड करता येणारे कंटेंट आणि विविध प्रांतांमध्‍ये उपलब्‍धतेच्‍या खात्रीसाठी बहुभाषिक मॉड्यूल्‍स देते.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाच्‍या एचआर अँड अ‍ॅडमिनिस्‍ट्रेशनचे वरिष्‍ठ संचालक; होंडा इंडिया फाऊंडेशनचे विश्‍वस्‍त विनय धिंगारा म्‍हणाले, “एचएमएसआयच्‍या सीएसआर दृष्टिकोनामध्‍ये रस्‍ता सुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. ई-गुरूकुलच्‍या माध्‍यमातून आमचा रोड सेफ्टी एज्‍युकेशन मॉड्युल्‍स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे, जे विविध वयोगटासाठी, विशेषत: तरूण वयात रस्‍ता सुरक्षिततेप्रती सकारात्‍मक मानसिकता बिंबवण्‍यासाठी विकसित करण्‍यात आले आहेत.लाँच करण्‍यात आलेले ई-गुरूकुल २०५० पर्यंत शून्‍य वाहतूक अपघाताच्‍या होंडाच्‍या जागतिक दृष्टिकोनाप्रती योगदान देण्‍याच्‍या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल आहे.

ई-गुरूकुलचे लाँच मुले, शिक्षक व डिलर्सना सुरक्षित रस्‍ता पद्धतींना प्राधाान्‍य देण्‍यास सक्षम करण्‍याच्‍या एचएमएसआयच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांचा भाग आहे. हा उपक्रम प्रत्‍येक राज्‍यातील शाळांमध्‍ये राबवण्‍यात येईल, विविध वयेागटासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या रस्‍ता सुरक्षा शिक्षणाला चालना देण्‍यात येईल. ही माहिती मिळवण्‍यास इच्‍छुक असलेली कोणतीही शाळा येथे Safety.riding@honda.hmsi.in संपर्क साधू शकते.

शून्य वाहतूक अपघात हाच कंपनीचा उद्देश

२०२१ मध्‍ये, होंडाने वर्ष २०५० साठी आपल्‍या जागतिक दृष्टिकोन स्‍टेटमेंटची घोषणा केली, जेथे कंपनी होंडा मोटरसायकल्‍स व ऑटोमोबाइल्‍सचा समावेश असलेले शून्‍य वाहतूक अपघातासाठी प्रयत्‍न करेल. भारतात, एचएमएसआय या दृष्टिकोनाशी, तसेच २०३० मध्‍ये अपघातांचे प्रमाण निम्‍मे कमी करण्‍याच्‍या भारत सरकारच्‍या निर्देशाशी बांधील राहत काम करत आहे.

हे ध्‍येय संपादित करण्‍यामधील महत्त्वपूर्ण पैलू म्‍हणजे वर्ष २०३० पर्यंत मुलांमध्‍ये रस्‍ता सुरक्षिततेप्रती सकारात्‍मक मानसिकता विकसित करणे आणि त्‍यानंतर देखील त्‍यांना जागरूक करत राहणे. शाळा व कॉलेजमध्‍ये रस्‍ता सुरक्षिततेची शिक्षण जागरूकता निर्माण करण्‍यासोबत तरूणांमध्‍ये रस्‍ता सुरक्षिततेबाबत जागरूकता देखील निर्माण करेल आणि त्‍यांना रोड सेफ्टी अ‍ॅम्‍बेसेडर्स बनवेल.

Web Title: Honda launched e gurukul a digital road safety learning platform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 07:40 PM

Topics:  

  • auto news
  • Road Safety

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.