होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाकडून नवीन २०२५ एसपी१२५ लाँच;
देशात अनेक उत्तम बाईक्स लाँच होताना दिसत आहे. त्यातही अनेक दुचाकी उत्पदक कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार बजेट फ्रेंडली बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपनी आहेत ज्या स्वस्तात मस्त बाईक्स लाँच करत असतात. त्यातीलच एक म्हणजे होंडा कंपनी.
होंडाने देशात अनेक उत्तम आणि आकर्षक बाईक लाँच केल्या आहेत. कंपनीकडून अनेक बाईक्सची किंमत अगदी मापक ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अनेक बाईक्स मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातलंच एक म्हणजे होंडा एसपी 125. आता कंपनीने या बाईकचे नवीन मॉडेल बाजारात लाँच केले आहे.
Honda SP125 ही होंडाने भारतीय मार्केटमध्ये ऑफर केलेल्या एंट्री-लेव्हल 125cc कम्युटर बाइक्सपैकी एक आहे. चला या बाईक्समधील फीचर्स जाणून घेऊया.
नवीन 2025 Honda SP125 भारतीय मार्केटमध्ये 91,771 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. Honda SP125 आता आगामी OBD2B नियमांचे पालन करण्यासाठी अपडेट केली गेली आहे. या टू-व्हीलरमध्ये नवीन डिझाइन आणि नव्याने आधुनिक फीचर्स देखील समाविष्ट आहेत. जे प्रतिस्पर्ध्यांसह स्पर्धेत मजबूत राहण्यास मदत करते.
ही बाईक कम्यूटर ड्रम आणि डिस्क व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पाच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल सायरन ब्लू, इम्पीरियल रेड मेटॅलिक आणि मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक सारख्या रंगांचा समावेश आहे.
एंट्री-स्पेक ड्रम ब्रेक व्हेरियंटसाठी Honda SP125 ची किंमत 91,771 रुपये आहे. टॉप-स्पेक डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत 1,00,284 रुपये आहे. ही बाईक संपूर्ण भारतात Honda मोटरसायकल आणि स्कूटर डीलरशिपवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
या बाईकमध्ये 124cc, सिंगल-सिलेंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते, जे 10.7 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या वाहनाची इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे.
या बाइकमध्ये नवीन ऑल-एलईडी हेडलॅम्प व टेललॅम्प, तसेच आक्रमक टँक श्रॉड्स, क्रोम मफलर कव्हर आणि सुधारित ग्राफिक्स आहेत. ही फीचर्स बाईकला अधिक लक्षवेधक बनवतात.
नवीन एसपी१२५ मध्ये आता ४.२-इंच टीएफटी डिस्प्लेसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आणि होंडा रोडसिंक अॅप आहे, ज्यामुळे स्मार्ट राइडसाठी सुलभ नेव्हिगेशन व वॉईस असिस्ट मिळते. तसेच यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग पॉइण्ट आधुनिक काळातील राइडर्सच्या गरजांची पूर्तता करते.
एंट्री-स्पेक ड्रम ब्रेक प्रकारासाठी Honda SP125 ची किंमत 91,771 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप-स्पेक डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,00,284 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. हे संपूर्ण भारतात Honda मोटरसायकल आणि स्कूटर डीलरशिपवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.






