फोटो सौजन्य AI
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी इराणकडून जीवाला धोका असल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर वाशिंग्टन डी.सी. येथील आपले निवासस्थान सोडून एका अज्ञात लष्करी तळावर स्थलांतर केले अशी माहिती मिळत आहे .या बातमीमुळे अमेरिकेचे नाक बऱ्यापैकी कापले गेले आहे . हासत्तेच्या अर्थमंत्र्याला स्वतःच्याच देशात असा सैनिकी आसरा घ्यावा लागतोय ही खूपच खेदाची बाब असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत .
अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . असे समजत आहे ,द न्यूयॉर्क टाइम्सने या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन व्यक्तींच्या हवाल्याने सगळ्यात आधी दिली . त्यानंतर रॉयटर्सनेही दोन सूत्रांच्या आधारे बसेन्ट यांच्या स्थलांतराला दुजोरा दिला . मात्र त्यांच्यावरील धमक्यांची नेमकी तीव्रता अजूनही स्पष्ट झालेली नाही .
स्कॉट बेसेन्ट हे इराणविरोधातील अमेरिकेच्या आर्थिक निर्बंध आणि दबाव मोहिमेचे प्रमुख नेतृत्व करत आहेत. ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ या मोहिमेअंतर्गत इराणची आर्थिक ताकद कमकुवत करण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, इराणने जहाजांवरील हल्ले थांबवावेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी, यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढवला जात आहे. या मोहिमेमुळे बेसेन्ट हे इराणच्या निशाण्यावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेसेन्ट यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढण्यामागे त्यांच्या वाशिंग्टनमधील घराचा हवाई फोटो प्रसिद्ध झाल्याचेही सांगितले जात आहे . वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या या छायाचित्रामुळे त्यांच्या जॉर्जटाऊन मधील घराचे अचूक ठिकाण ओळखणे शक्य झाले होते . त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना लष्करी तळावर हलवण्यात आल्याची मी,माहिती समोर आली आहे .
मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते कोणत्या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत ,याचा तपशील सार्वजनिक करण्यात आला नाही . अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बेसेन्ट इराणच्या धमक्यांमुळे मागे हटणार नसल्याचे स्पष्ठ केले आहे . आर्थिक दबावाची मोहीम आणि इराणवरील निर्बंध सुरूच राहतील , असेही सांगण्यात आले . याचदरम्यान इराणने यापूर्वी अमेरिकेच्या भूमीवर अधिकारी किंवा नागरिकांवर हल्ल्याचा कट रचल्याचे आरोप फेटाळले आहेत . त्यामुळे या प्रकरणामुळे अमेरिका आणि इराण मधील तणावाला आणखी गंभीर रूप मिळण्याची शक्यता आहे .






