फोटो सौैजन्य: @ZattarRafael (X.com)
भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार्स ऑफर होत असतात. पण यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना जास्त मागणी पाहायला मिळते. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट फीचर्ससह दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही लाँच करत असतात.
साऊथ कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने भारतात दमदार कार्स सादर केल्या आहेत. यातीलच एक पॉवरफुल आणि लोकप्रिय कार म्हणजे ह्युंदाई क्रेटा.
Mahindra च्या 2 इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तुटून पडले लोकं, 6 महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड
ह्युंदाई क्रेटा ही सध्या भारतात सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट SUV ठरली आहे. मार्च 2025 मध्येच क्रेटाच्या 18,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली, ज्यातून तिच्या जबरदस्त लोकप्रियतेची प्रचिती येते. विशेषतः या कारचे डिझेल व्हर्जन एकदा फुल टँक भरल्यानंतर तब्बल 1,000 किमीहून अधिक अंतर पार करू शकते, त्यामुळे लाँग ड्राईव्हसाठी ही SUV आदर्श ठरते. मात्र, खरेदीपूर्वी या कारचे मायलेज जाणून घेणे महत्वाचे आहे.
ह्युंदाई क्रेटा तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:
या सर्व इंजिन पर्यायांसोबत 6-स्पीड मॅन्युअल, CVT (कंटिन्युअली व्हेरिएबल ट्रान्समिशन) आणि 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) अशा विविध गिअरबॉक्स ऑप्शन्स दिले गेले आहेत.
अरे बापरे ! Kia ला समजण्याच्या आतच ‘या’ प्लांटमधून 900 इंजिनची चोरी, आता पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
ह्युंदाई क्रेटामध्ये 50 लिटरची फ्युएल टॅंक आहे. या कारचा मायलेज खालीलप्रमाणे आहे:
लक्षात घ्या, खरे मायलेज मात्र चालकाच्या ड्रायव्हिंग स्टाइल, ट्रॅफिक आणि रस्त्यांच्या स्थितीवर अवलंबून असते.
ह्युंदाई क्रेटाची एक्स-शोरूम किंमत ₹11.11 लाखांपासून सुरू होऊन ₹20.50 लाखांपर्यंत जाते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. कंपनीने ही SUV एकूण 54 वेगवेगळ्या ट्रिम्स आणि व्हेरियंट्समध्ये उपलब्ध करून दिली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, TPMS, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ESC अशा प्रगत सेफ्टी फीचर्स दिले आहेत.