
बेयॉन नावामागे खास कारण
ह्युंदाईनुसार ‘बेयॉन’ हे नाव फ्रान्समधील बास्क प्रदेशातील बेयॉन शहरावरून प्रेरित आहे. या शहराची वेगळी ओळख आणि गतिमान व्यक्तिमत्त्व आगामी SUV च्या स्वभावाशी जोडण्यात आले आहे. कंपनीने या SUV ला ‘इंटेलिजंट SUV’ म्हणून सादर केले असून तंत्रज्ञानाला या वाहनाच्या अनुभवाचा महत्त्वाचा भाग बनवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र नेमकी कोणती तंत्रज्ञान सुविधा मिळणार, याबाबत कंपनीने सध्या सविस्तर माहिती दिलेली नाही.
हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु
व्हेन्यू आणि क्रेटामधील नवा पर्याय?
ह्युंदाई बेयॉन सध्याच्या कोणत्याही मॉडेलची जागा घेणार नसून कंपनीच्या SUV लाइनअपमध्ये नवीन पर्याय म्हणून दाखल होण्याची शक्यता आहे. कंपनीने स्थान निश्चित केलेले नसले तरी हे मॉडेल व्हेन्यूच्या वर आणि क्रेटाच्या खाली येण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान ही SUV BC4i कोडनेमसह दिसली आहे. तिची लांबी सुमारे 4.18 मीटर असू शकते. स्पाय इमेजेसमध्ये बॉक्सी डिझाइन, आकर्षक LED लाइटिंग आणि DRLs दिसून आले आहेत.
इंजिन आणि फीचर्सची उत्सुकता
येणाऱ्या ह्युंदाई बेयॉनमध्ये 1.2L टर्बो पेट्रोल आणि 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केबिनमध्ये व्हेन्यूशी संबंधित ड्युअल कर्व्ह्ड स्क्रीन सेटअप मिळू शकतो. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. ह्युंदाईने अद्याप इंजिन, फीचर्स, सीटिंग कॉन्फिगरेशन किंवा किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या पुढील घोषणेकडे आता ग्राहकांचे लक्ष असेल.