Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लडाखच्या खडतर वाटांवर रॉयल एनफिल्ड हिमालयन 450! ऑफ-रोड राइडचा भन्नाट अनुभव

लडाखचे रस्ते आता चांगले झाले असले तरी खरी साहसी मजा अजूनही डांबरी रस्त्यांच्या पलीकडे लपलेली आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ने खडकाळ चढ, सैल गोटे आणि छोट्या पाणवठ्यांमधून मार्ग काढत या अनोख्या राइडमध्ये आपली क्षमता दाखवली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 14, 2026 | 07:39 PM
लडाखच्या खडतर वाटांवर रॉयल एनफिल्ड हिमालयन 450! ऑफ-रोड राइडचा भन्नाट अनुभव
Follow Us
Follow Us:
  • लडाखच्या खडतर ऑफ-रोड ट्रेल्सवर हिमालयन 450 ने दमदार क्षमता आणि संतुलित रायडिंगचा अनुभव दिला.
  • खडकाळ चढ, सैल गोटे आणि पाण्याच्या प्रवाहातून बाइकने आत्मविश्वासाने मार्ग काढला.
  • लडाख राइडपूर्वी उंचीशी जुळवून घेणे आणि योग्य अॅक्लिमेटायझेशन करणे रायडर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
लडाख म्हटलं की उंच पर्वत, वळणावळणाचे रस्ते आणि अविस्मरणीय बाइक राइड डोळ्यासमोर येते. आज लडाखमधील अनेक प्रमुख मार्गांवर चांगले डांबरी रस्ते झाले आहेत. पण खरी साहसी सफर करायची असेल तर मुख्य रस्ता सोडून खडकाळ आणि वाळवंटी ट्रेल्सवर जाण्याची मजा वेगळीच आहे. अशाच अनुभवासाठी रॉयल एनफिल्डच्या हिमालयन बेसकॅम्पदरम्यान ‘लडाख अनचार्टेड’ ऑफ-रोड राइड आयोजित करण्यात आली होती.

खडक, वाळू आणि पाण्याच्या वाटांवर राइड

या राइडमध्ये लेहजवळील चुचोट ग्राउंड्सपासून पुढे जाताना अरुंद ट्रेल, खडकाळ चढ आणि कालव्यालगतचे रस्ते पार करावे लागले. काही ठिकाणी वाळू, घट्ट गोटे आणि मोठे खडक असा मिश्र भूभाग होता. छोट्या पाण्याच्या प्रवाहातूनही हिमालयन 450 ने मार्ग काढला. अशा परिस्थितीत रायडरची बॉडी पोझिशन, थ्रॉटल कंट्रोल आणि योग्य लाइन निवडणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु

हिमालयन 450 ची साथ

या डेंजर आणि खडतर ट्रेलवर हिमालयन 450 मधील 450cc इंजिनचा मिड-रेंज टॉर्क उपयोगी ठरला. कठीण चढावर सतत क्लच वापरण्याची गरज न पडता नियंत्रित थ्रॉटलवर बाइक पुढे नेता आली. रस्त्यातील खड्डे, दगड आणि रट्सवर तिचे सस्पेन्शनही प्रभावी ठरले. गोट्यांवर मागचा भाग क्षणभर स्लाइड झाला तरी थ्रॉटल आणि योग्य कंट्रोलने बाइक पुन्हा स्थिर करता आली.

Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या

लडाखमध्ये बाइकपेक्षा तयारी महत्त्वाची

हिमालयन 450 सक्षम असली तरी ती हलकी एंड्युरो बाइक नाही. अतिशय सैल पृष्ठभाग किंवा अरुंद खडकाळ उतारावर तिचे वजन जाणवते. त्यामुळे अशा राइडसाठी रायडिंग कौशल्यासोबत शारीरिक तयारीही महत्त्वाची आहे. लडाखच्या उंचीशी जुळवून घेणे तर अत्यावश्यक आहे. लेहमध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीचे 24 तास शरीराला आराम देणे आणि अॅक्लिमेटायझेशनवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे या अनुभवातून स्पष्ट होते.

Web Title: Royal enfield himalayan 450 ladakh off road ride experience auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield
  • Trekking

संबंधित बातम्या

एथर कोनार्कला टक्कर देणाऱ्या या आहेत 6 पेट्रोल स्कूटर! तुमच्या कुटुंबासाठी कोणता पर्याय ठरेल योग्य?
1

एथर कोनार्कला टक्कर देणाऱ्या या आहेत 6 पेट्रोल स्कूटर! तुमच्या कुटुंबासाठी कोणता पर्याय ठरेल योग्य?

Honda City CVT Real Mileage: होंडा सिटी CVT किती मायलेज देते? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये समोर आला आकडा
2

Honda City CVT Real Mileage: होंडा सिटी CVT किती मायलेज देते? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये समोर आला आकडा

BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु
3

BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु

डुकाटीची ही Adventure Bike शहरापासून ऑफ-रोडिंगपर्यंत सगळीकडे भारी!  890cc V-Twin इंजिनची ही आहे खासियत
4

डुकाटीची ही Adventure Bike शहरापासून ऑफ-रोडिंगपर्यंत सगळीकडे भारी!  890cc V-Twin इंजिनची ही आहे खासियत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.