फोटो सौजन्य:Social Media
वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहनांना भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ग्राहकांची हीच वाढती मागणी पाहून अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. तसेच या इलेक्ट्रिक कार्समध्ये उत्तम फीचर्स सुद्धा कंपनी समाविष्ट करत आहे.
देशात अनेक वर्षांपासून ह्युंदाई कंपनी उत्तोमोत्तम कार्स ऑफर करत आहे. आता कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाकडे सुद्धा लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती की लवकरच इलेक्ट्रिक क्रेटा मार्केटमध्ये लाँच होणार आहे. आता अखेर ही कार मार्केटमध्ये जानेवारीमध्ये दाखल होणार आहे.
आजपासून Honda Activa e आणि QC1 ची बुकिंग सुरु, ‘या’ शहरांना डिलिव्हरीसाठी पहिले प्राधान्य
ह्युंदाई कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV म्हणून Hyundai Creta EV ला लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी एसयूव्हीचा पहिला टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. त्यात कोणत्या प्रकारची माहिती उपलब्ध जाई आहे? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Hyundai Creta EV लवकरच Hyundai Motor India नवीन इलेक्ट्रिक SUV म्हणून लाँच करेल. लाँच होण्याआधी या इलेक्ट्रिक कारचा पहिला टीझर कंपनीने सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
सोशल मीडियावर रिलीज झालेल्या पहिल्या टिझरमध्ये फक्त एक फोटो देण्यात आला आहे. ज्यामध्ये एका चार्जरसोबत Electric is now Creta असे लिहिले आहे. हा चार्जर घराच्या भिंतीवर बसवण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की इलेक्ट्रिकमधील एक ठळक नवीन अध्याय लवकरच सुरू होईल. Hyundai CRETA Electric तुमची कार चालवण्याची पद्धत कायमची बदलण्यासाठी सज्ज आहे. नवनिर्मितीचे काउंटडाउन सुरू झाले आहे!
Royal Enfield Himalayan 750 टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, बाईकच्या लूकने वेधले लक्ष
कंपनीकडून SUV बाबत अजून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचे डिझाईन Hyundai Creta च्या ICE व्हर्जन प्रमाणेच ठेवले जाईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच पेट्रोल-डिझेल व्हर्जनच्या एसयूव्हीप्रमाणेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही हेच फिचर्स असतील.
इलेक्ट्रिक क्रेटामध्ये कंपनी 45kWh क्षमतेची बॅटरी देऊ शकते, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 400 किलोमीटरची रेंज मिळवू शकते. याशिवाय, कंपनी त्यात आणखी एका बॅटरीचा पर्याय देऊ शकते, ज्यामुळे त्याची रेंज सुमारे 500 किलोमीटर असू शकते. या एसयूव्हीमध्ये फक्त सिंगल मोटरचा पर्याय दिला जाऊ शकतो.
Hyundai ने अद्याप या इलेक्ट्रिक कारच्या लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की Hyundai Creta EV कंपनी 17 जानेवारी 2025 रोजी अधिकृतपणे लाँच करेल. तसेच तेव्हा त्याच्या किंमतीबद्दल देखील खुलासा होईल अशी आशा आहे.