फोटो सौजन्य: Social Media
रॉयल एनफिल्ड मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोठ्या धमाक्यासाठी तयारी करत आहे. या सीरिजमध्ये रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चे काही फोटो या बाईकच्या टेस्टिंग दरम्यान काढण्यात आले आहेत. आगामी रॉयल एनफील्ड हिमालयन 750 बाइकने येताच इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. Royal Enfield Himalayan 750 Spy Shots द्वारे या बाईकबद्दलची अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे.
रॉयल एनफील्ड हिमालयन 750 चे फोटो पाहता हे कळते की या बाईकमध्ये स्पोक व्हील सेटअप दिला जाऊ शकतो. या बाईकचे पुढचे चाक 19 इंच आणि मागील चाक 17 इंच असेल. रॉयल एनफिल्डच्या आगामी बाईकच्या फ्रंट ब्रेकिंग सेटअपमध्ये ट्विन डिस्क ब्रेक असण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये हे पहिल्यांदाच असे करू शकते.
Hyundai Creta च्या बेस व्हेरियंटवर 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI
लीक झालेल्या बातम्यांनुसार, ऑफ-रोडर्सना रॉयल एनफील्ड हिमालयन 750 बाईक आवडू शकते. रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 च्या फोटोंनुसार, या बाईकला चांगली आणि मजबूत इंधन टाकी, एलईडी लाइटिंग, मोठी TFT स्क्रीन, मोठी विंड स्क्रीन यासारखे आकर्षक लूक मिळू शकते. 2025 च्या अखेरीस ही बाईक भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकतो असे रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.
अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की रॉयल एनफील्ड हिमालयन 750 चे फोटो बाईकबद्दल बरीच खास माहिती देतात. रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield Himalayan 750 बाईकची बॉडी युनिक घटकांसह आणली जाऊ शकते. Royal Enfield Himalayan 750 बाईक समोरच्या चाकामध्ये ॲडजस्टेबल अपसाइड डाउन फॉर्क्स अप फ्रंट सस्पेंशनसह येऊ शकते. तर मागील चाकामध्ये ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन आढळू शकते.
कमी किंमतीत कार खरेदी करण्याची आज शेवटची संधी, उद्यापासून ‘या’ कार्स होणार महाग
रॉयल एनफील्ड हिमालयन 750cc ची भारतात किंमत अंदाजे 3 लाख रुपये असू शकते असा दावा इंटरनेटवर लीक झालेल्या अहवालात केला जात आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन 750 बाइकमध्ये 750cc ट्विन सिलेंडर आढळू शकतो. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की रॉयल एनफील्डच्या सध्याच्या 650cc बाईकपेक्षा ती थोडी मोठी असेल. हे 52bhp पॉवर आणि 56nm टॉर्क जनरेट करू शकते. Royal Enfield Himalayan 750 चे इंजिन अॅडव्हेंचर टूरिंग डिझाइनसह येण्याची शक्यता आहे.