फोटो सौजन्य: iStock
2024 मध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली होती. त्यातीलच एक वाहनं म्हणजे होंडाची इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा. नोव्हेंबर 2024 मध्ये होंडा कंपनीने Honda Activa e आणि QC1 लाँच केली होती. लाँचच्या आधीपासूनच या स्कूटरची चर्चा मार्केटमध्ये होताना दिसत आहे. तसेच कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणते फीचर्स समाविष्ट करणार आहे, याबद्दल सुद्धा अनेकांना उत्सुकता होती. आता नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
Royal Enfield Himalayan 750 टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, बाईकच्या लूकने वेधले लक्ष
नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवसापासून Honda Activa e आणि QC1 नावाच्या दोन्ही स्कूटरचे बुकिंग सुरू झाले आहे. दोन्ही स्कूटरसाठी किती बुकिंग केले जाऊ शकते? बुकिंग कुठे करता येईल? त्यांच्या किंमती कधी जाहीर होणार? यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि रेंज मिळेल? याबद्दल जाणून घेऊया.
Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने 1 जानेवारी 2025 पासून Honda ACTIVA e आणि Honda QC1 इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अधिकृतपणे बुकिंग सुरू केली आहे. दोन्ही स्कूटर कंपनीने 27 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत सादर केल्या होत्या. कंपनीने सादर केलेल्या या पहिल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Honda ACTIVA e आणि QC1 चे बुकिंग देशातील पाच प्रमुख राज्यांमधील शहरांमध्ये केले जाणार आहे. ज्यामध्ये बेंगळुरू, दिल्ली, महाराष्ट्र, चंदीगड, कर्नाटक आणि हैदराबादचा समावेश आहे. या राज्यांतील काही शहरांतील निवडक Honda टू-व्हीलर डीलरशिपवरच या स्कूटरला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Honda Activa e आणि Honda QC1 इलेक्ट्रिक स्कूटरसाठी, ग्राहकांना बुकिंग रक्कम म्हणून फक्त 1,000 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरून बुकिंग करता येईल.
Hyundai Creta च्या बेस व्हेरियंटवर 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI
Honda ने आणलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीही या महिन्यात जाहीर केल्या जातील. दोन्ही स्कूटर अधिकृतपणे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लाँच केल्या जातील. दोन्ही व्हेरियंटची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल.
Activa E मध्ये, कंपनीने सात इंच स्क्रीन, Honda Road Sing Duo ॲप दिले आहे, जे OTA अपडेट्स, कॉल्स, सेवांसाठी वापरले जाऊ शकते. याशिवाय यात मोठी सीट, स्मार्ट की, यूएसबी सी आणि हुक, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, इनबिल्ट जीपीआरएस, डे अँड नाईट मोड, नेव्हिगेशन यांसारखे फीचर्स देण्यात येणार आहेत.
तर Honda QC1 स्कूटरमध्ये पाच इंच स्क्रीन आहे. याशिवाय 26 लिटर क्षमतेचे सीट स्टोरेज अंतर्गत देण्यात आले आहे. हे पर्ल सेरेनिटी ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, मॅट फॉगी सिल्व्हर मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल शॅलो ब्लू कलर पर्यायांमध्ये आणले गेले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उत्कृष्ट रीअर-व्ह्यू मिरर, स्टायलिश 12-इंच फ्रंट अलॉय व्हील आहेत.