Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta vs Tata Sierra vs Maruti Grand Vitara! मिडीयम बजेटच्या ‘किंग’ SUV;  कोणामध्ये आहे जास्त दम?

भारतीय ऑटो बाजारात मिडीयम बजेट एसयूव्ही मध्ये हुंदाई क्रेटा, टाटा सिएरा आणि मारुती ग्रँड विटारा यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. प्रीमियम डिझाइन व फीचर्ससाठी क्रेटा, दणकट सेफ्टी व बॉक्सी लुकसाठी सिएरा, तर हायब्रिड तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ग्रँड विटारा ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 29, 2026 | 07:00 AM
Hyundai Creta vs Tata Sierra vs Maruti Grand Vitara! मिडीयम बजेटच्या ‘किंग’ SUV;  कोणामध्ये आहे जास्त दम?
Follow Us
Follow Us:
  • हुंदाई क्रेटा: आकर्षक स्पोर्टी डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि अत्यंत स्मूथ ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव मिळतो.
  • टाटा सिएरा: मजबूत बिल्ड क्वालिटी, बॉक्सी रेट्रो लुक आणि खडतर रस्त्यांवर सुरक्षित ड्रायव्हिंग मिळते.
  • मारुती ग्रँड विटारा: हायब्रिड तंत्रज्ञान, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी गाडी.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मिडीयम बजेट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. मिडल क्लास लोकांना परवडणारी आणि रंगा-रूपाने-गुणानेही चांगली असणारी गाडी कोणती याची ओढ लागलेली असते. तुमच्या या सगळ्या क्रायटेरिया मध्ये बसणाऱ्या हुंदाई क्रेटा, टाटा सिएरा,  आणि मारुती ग्रँड विटारा, या तिन्ही गाड्या स्वतःच्या छप्परफाड वैशिष्ट्यांमुळे बाजारात दणका उडवत आहेत. या तिन्ही गाड्यांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आपण पाहूयात,

१. हुंदाई क्रेटा  

  • लुक आणि डिझाइन: क्रेटाचा लुक आधुनिक, स्पोर्टी आणि प्रीमियम आहे. तिची फ्रंट पॅरामेट्रिक ग्रिल, कनेक्टेड LED लाईट्स आणि आकर्षक बॉडी लाईन्स शहरात उत्तम रोड प्रेझेंस देतात.
  • इंजिन पॉवर: यात १.५-लिटर पेट्रोल, १.५-लिटर डिझेल आणि १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळतात. हे इंजिन ११५ bhp ते १६० bhp ची पॉवर जनरेट करतात.
  • ड्रायव्हिंग (शहरी व ग्रामीण): स्मूथ स्टेअरिंग आणि मऊ सस्पेंशनमुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये ही गाडी चालवणे सोपे आहे. तसेच ग्रामीण भागातील खडखडीत रस्त्यांवरही आरामदायी राइड मिळते.
  • मायलेज व बजेट: क्रेटाचे मायलेज १५ ते २१.८ किमी/लिटरदरम्यान आहे. तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹१०.९१ लाख ते ₹२० लाख रुपयांपर्यंत जाते.

    Hyundai Creta

Hyundai SUV: ह्युंडाई लाँच करणार ४ नवीन एसयूव्ही! पुढील वर्षभरात होणार मार्केटमध्ये दाखल

२. टाटा सिएरा  

  • लुक आणि डिझाइन: जुन्या आयकॉनिक सिएराचे हे फ्युचरिस्टिक रूप आहे. यात मोठा ग्लास एरिया, मस्क्युलर डिझाईन आणि बॉक्सी-रेट्रो लुक मिळतो, जो रस्त्यावर वेगळाच रुबाब दाखवतो.
  • इंजिन पॉवर: यात १.५-लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल इंजिन पर्याय मिळतात, जे १०५ bhp ते १५८ bhp पॉवर आणि मजबूत टॉर्क देतात.
  • ड्रायव्हिंग (शहरी व ग्रामीण): दणकट बिल्ड क्वालिटी आणि उत्तम ग्राउंड क्लिअरन्समुळे ही गाडी ग्रामीण भागातील कठीण रस्त्यांवर व महामार्गांवर अतिशय सुरक्षित आणि स्थिर अनुभव देते.
  • मायलेज व बजेट: सिएराचे मायलेज १६ ते २१ किमी/लिटरपर्यंत मिळते. तिची एक्स-शोरूम किंमत ₹११.४९ लाख ते ₹२१.२९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

    Tata Sierra

टाटा मोटर्सची मोठी झेप; ‘प्रवास ५.०’ मध्ये नवीन अल्ट्रा प्राइम आणि स्टारबस प्राइम श्रेणी लाँच!

३. मारुती ग्रँड विटारा  

  • लुक आणि डिझाइन: ग्रँड विटाराची डिझाईन स्लीक आणि सोबर आहे. क्रोम फिनिश ग्रिल आणि आधुनिक टेल-लॅम्प्समुळे ती दिसायला अत्यंत क्लासिक वाटते.
  • इंजिन पॉवर: यात १.५-लिटर माईल्ड हायब्रिड, १.५-लिटर स्ट्रॉंग हायब्रिड- पेट्रोल आणि CNG पर्याय मिळतात. इंजिन १०२ bhp ते ११४ bhp ची पॉवर देते.
  • ड्रायव्हिंग (शहरी व ग्रामीण): ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) व्हेरियंटमुळे ग्रामीण भाग व चिखलाच्या रस्त्यांवर उत्तम ग्रिप मिळते, तर हायब्रिड इंजिनमुळे शहरातील ड्रायव्हिंग शांत आणि मऊ वाटते.
  • मायलेज व बजेट: हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही गाडी तब्बल २१ ते २७.९७ किमी/लिटरपर्यंतचे सेगमेंटमधील सर्वोत्तम मायलेज देते. तिची एक्स-शोरूम किंमत ₹१०.९९ लाख ते ₹१९.९३ लाख रुपयांपर्यंत आहे.

    Maruti Grand Vitara

कोणामध्ये आहे जास्त दम?

जर तुम्हाला भरपूर फीचर्स, रिफाइंड इंजिन आणि रफ-एंड-टफ ऑलराउंडर हवा असेल, तर क्रेटा योग्य पर्याय आहे. मजबूत सुरक्षा, बोल्ड लुक आणि रॉ पॉवर हवी असल्यास टाटा सिएरा सर्वोत्तम ठरते. तर उत्तम मायलेज, कमी मेंटेनन्स आणि रोजच्या वापरासाठी ग्रँड विटारा राजा आहे!

Web Title: Hyundai creta vs tata sierra vs grand vitara comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • Maruti
  • Tata

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.