Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉर्टनच्या 2 नवीन बाइक्स भारतात येणार! Manx R आणि Atlas GT चे डिझाइन पेटंट बुक! पाहा डिटेल्स

ब्रिटिश नॉर्टन कंपनीच्या Norton Manx R आणि Norton Atlas GT या 2 बाइक्सचे डिझाइन पेटंट भारतात दाखल झाले आहे. 203 bhp पॉवरची Manx R आणि 585 cc इंजिनची Atlas GT 2027 मध्ये भारतीय मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 16, 2026 | 02:57 PM
Norton Manx R and Atlas GT Motorcycles (फोटो सौजन्य-AI एआय)

Norton Manx R and Atlas GT Motorcycles (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • नॉर्टन Manx R मध्ये 1,200 cc V4 इंजिन असून ते 203 bhp पॉवर जनरेट करते.
  • Norton Atlas GT मध्ये 585 cc इंजिन, 69 bhp पॉवर आणि 57.5 Nm टॉर्क मिळतो.
  • Manx R चे लाँच Q1 2027 मध्ये, तर Atlas GT चे लाँच Q2 2027 मध्ये अपेक्षित आहे.

ब्रिटिश प्रीमियम मोटरसायकल ब्रँड नॉर्टन भारतात आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या Norton Manx R आणि Norton Atlas GT या 2 नवीन बाइक्सचे डिझाइन पेटंट भारतात दाखल केले आहे. त्यामुळे या दोन्ही मोटरसायकल लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापैकी Manx R ही कंपनीची पहिली सुपरबाइक ठरू शकते. तिचे लाँच Q1 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे, तर Atlas GT Q2 2027 मध्ये भारतात येऊ शकते.

नॉर्टनने EICMA 2025 मध्ये Manx, Manx R, Atlas आणि Atlas GT अशा 4 नवीन मोटरसायकल सादर केल्या होत्या. त्यापैकी Manx R ही फुली फेयर्ड सुपरस्पोर्ट्स बाइक आहे. या बाइकला LED लाइटिंग, सिग्नेचर DRL, अंडरस्लंग एक्झॉस्ट, सिंगल साइडेड स्विंगआर्म आणि कार्बन फायबर बॉडी पॅनल्स देण्यात आले आहेत. तसेच कार्बन फायबर व्हील्समुळे तिचे प्रीमियम डिझाइन आणखी उठून दिसते.

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?

Norton Manx R मध्ये 8 इंचांची टचस्क्रीन TFT डिस्प्ले देण्यात आली आहे. यामध्ये GoPro इंटिग्रेशन आणि Norton अॅपद्वारे रिमोट अॅक्सेसची सुविधा मिळते. रेन, रोड, स्पोर्ट आणि 2 कस्टमाइजेबल ट्रॅक अशा 5 रायडिंग मोड्सचा समावेश आहे. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, लीन सेन्सिटिव्ह ABS आणि क्विकशिफ्टरसारखी फीचर्स मिळतात.

या सुपरबाइकला 1,200 cc लिक्विड कूल्ड V4 इंजिन मिळते. हे इंजिन 11,500 rpm वर 203 bhp पॉवर आणि 9,000 rpm वर 130 Nm टॉर्क जनरेट करते. बाइकचे वजन 204 किलो असून यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

दुसरीकडे, Norton Atlas GT ही रोड टूरिंगसाठी तयार करण्यात आलेली मोटरसायकल आहे. या बाइकचे प्रोडक्शन तामिळनाडूमधील होसूर येथील TVS प्लांटमध्ये सुरू झाले आहे. यात ड्युअल प्रोजेक्टर LED हेडलॅम्प, 17 इंचांची अलॉय व्हील्स, गोल्डन USD फ्रंट फोर्क्स, सिंगल पीस सीट आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन मिळते.

Atlas GT मध्ये 585 cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 9,300 rpm वर 69 bhp पॉवर आणि 7,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क देते. यात कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लीन सेन्सिटिव्ह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग, 5 रायडिंग मोड्स आणि बायडायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळतो. या बाइकचे वजन 192 किलो आहे. भारतातील लाँचनंतर नॉर्टनच्या या दोन्ही बाइक्स प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये कशी छाप पाडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Norton Manx R भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: Norton Manx R ही सुपरबाइक भारतात Q1 2027 म्हणजेच जानेवारी ते मार्च 2027 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.

  • Que: Norton Manx R मध्ये किती cc चे इंजिन मिळते?

    Ans: या सुपरबाइकमध्ये 1,200 cc लिक्विड कूल्ड V4 इंजिन आहे. हे इंजिन 203 bhp पॉवर आणि 130 Nm टॉर्क जनरेट करते.

  • Que: Norton Atlas GT मध्ये किती cc चे इंजिन आहे आणि ती कधी लाँच होणार?

    Ans: Norton Atlas GT मध्ये 585 cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन मिळते. ही बाइक Q2 2027 मध्ये म्हणजेच एप्रिल ते जून 2027 दरम्यान भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Norton manx r atlas gt india launch design patent auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • two wheelers

संबंधित बातम्या

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
1

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Renault Bridger & Renault Bigster: ऑटो एक्स्पो 2027 मध्ये रेनोल्टच्या 2 नवीन SUV दाखल होणार?
2

Renault Bridger & Renault Bigster: ऑटो एक्स्पो 2027 मध्ये रेनोल्टच्या 2 नवीन SUV दाखल होणार?

Ashok Leyland Q2 Results: अशोक लेलँडच्या नफ्यात 13% वाढ! दुसऱ्या तिमाहीत 869 कोटींची कमाई
3

Ashok Leyland Q2 Results: अशोक लेलँडच्या नफ्यात 13% वाढ! दुसऱ्या तिमाहीत 869 कोटींची कमाई

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता
4

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.