फोटो सौजन्य- Hyundai official Website
Hyundai मोटर्सने ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान असलेली Exter लॉंच केली आहे. भारतामध्ये ड्युअल सिलेंडर वापरणारी ह्युंदाई ही Tata Motors नंतर दुसरी कंपनी ठरली आहे. Tata Motors ही भारतात ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह Tata Punch CNG कार लॉंच केली होती, या ड्युअल-सिलेंडर CNG कारमध्ये अधिक बूट स्पेस (वाहनाच्या मागील भागात सामान ठेण्यासाठी असणारी जागा) सामावून घेण्यात मदत होते.
Hyundai ने लॉंच केलेल्या नव्या Exter ला Exter CNG Duo असे नाव दिले आहे, Exter ची 8,50,300 रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या मॉडेलची किमत असून ही कार S, SX आणि EXTER KNIGHT SX, ही या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Tata Punch CNG मध्ये दोन लहान सिलेंडर आहेत त्यामुळे त्याचा विक्रीसाठी प्रचंड फायदा झाला होता. आता ह्युंदाई मोटर्सने Exter मध्येही दोन लहान CNG सिलेंडर्स लावल्याने Exter ची थेट स्पर्धा Tata Punch शी होणार आहे. ज्याचा Punch च्या विक्रीवर थेट परिणाम होणार आहे.
Hyundai Exter Hy-CNG Duo: Powertrain
नव्या Exter मध्ये 1.2.1 bifuel (CNG सह पेट्रोल) इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे, जे 69PS पॉवर आणि 95.2Nm टॉर्क वितरीत करते. ही SUV कार 27.1 Km/kg चे माईलेज देते (ARAI चाचणी केलेले). इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) सह कंपनी-फिट सीएनजी प्रणालीसह सुसज्जआहे, Hyundai Exter Hy-CNG Duo: Tata Motors ही भारतात ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह CNG कार लॉन्च करणारी पहिली कंपनी होती, ज्यामुळे त्यांच्या CNG कारमध्ये अधिक बूट स्पेस सामावून घेण्यात मदत झाली. आता ह्युंदाई मोटर्सने एक्स्टरमध्ये ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान वापरले आहे.
Hyundai Exter ची वैशिष्ट्ये
Hyundai Exter च्या वैशिष्ट्यांमध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएल तसेच एलईडी टेल लॅम्प, ऑटोमॅटिक एसी, 20.32 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, तब्बल 6 एअरबॅग्ज, टीपीएमएस, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल इत्यांदीचा समावेश आहे.






