फोटो सौजन्य: motoringworld.in
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे, ज्यांनी विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. Maruti Brezza ही त्यातीलच एक सुपरहिट कार. ही कार खरेदी करताना 28 टक्के GST दिला जातो, ज्यामुळे ही कार सामन्यांना जरा जास्त महाग वाटते. मात्र, आता जीएसटी कमी होणार अशी बातमी सगळीकडे रंगली आहे.
यंदाच्या दिवाळीत मोदी सरकार अनेक वस्तूंवरील GST कमी करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये कारचाही समावेश आहे. सध्या या कारवर 28% जीएसटी आणि 1% सेस आकारला जातो, म्हणजेच एकूण 29% कर. पण जर हाच कर 18% केला तर ग्राहकांना थेट 10% चा फायदा मिळेल. अशा परिस्थितीत, जर मारुती ब्रेझावरील जीएसटी कमी झाला तर ही कार पूर्वीपेक्षा किती स्वस्त होईल हे जाणून घेऊया?
एक दोन नव्हे तर सलग 8 दिवस चालवली गेली Mercedes ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार, तोडले 25 ग्लोबल रेकॉर्ड
मारुती ब्रेझाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,69,000 आहे. जर यावर 19% GST लागू झाला, तर ग्राहकांना तब्बल 64,900 पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
दमदार फीचर्समुळे Maruti brezza ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. यात ड्युअल टोन इंटीरियर दिलेले असून, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे Wireless Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. यासोबत 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग सारख्या सुविधा मिळतात. SUV मध्ये रिअर AC व्हेंट्स, हेड्स-अप डिस्प्ले, फास्ट-चार्जिंग USB पोर्ट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स असे स्मार्ट फीचर्सही दिलेले आहेत.
35 KM चा मायलेज आणि किंमतही खिशाला परवडणारी! रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ कार
सेफ्टीच्या बाबतीतदेखील Maruti Brezza एक मजबूत पर्याय आहे. यात 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-डिमिंग IRVM, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स असे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स मिळतात. त्याशिवाय, यात ABS विद EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, हाय-स्पीड वॉर्निंग सिस्टम आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी सेफ्टी फिचर्सही दिली आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, मारुती ब्रेझाला 1.5-लिटर के-सिरीज ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन मिळते, जे 101.6 बीएचपी पॉवर आणि 136.8 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय आहेत. सीएनजी व्हेरिएंटमध्येही हेच इंजिन दिले आहे, परंतु त्यातील पॉवर आउटपुट 86.6 बीएचपी आणि 121.5 एनएम पर्यंत आहे.