Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता दोन इलेक्ट्रिक एसयूव्हीला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीला चांगली मागणी
  • 10 महिन्यात तब्बल 41000 युनिट्सची झाली विक्री
  • जाणून घ्या या दोन इलेक्ट्रिक एसयूव्हीबद्दल
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 2025 मध्ये लाँच झालेल्या Mahindra च्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील भारतात चांगल्याच गाजल्या. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे फ्यूचरिस्टिक लूक आणि दमदार पेर्फोर्मन्समुळे ग्राहकांनी या दोन्ही एसयूव्हींना भरभरून प्रतिसाद दिला. या एसयूव्ही म्हणजे Mahindra BE 6 आणि XEV 9e.

महिंद्रा इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करताना दिसत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या BE 6 आणि XEV 9e चे यश हे स्पष्टपणे दर्शवते. खरं तर, कंपनीने 10 महिन्यांत या दोन्ही एसयूव्हीच्या 41,000 युनिट्स विकल्या आहेत.

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

BE 6 आणि XEV 9e त्यांच्या भविष्यकालीन डिझाइन तसेच मजबूत श्रेणीसाठी ओळखले जातात. जानेवारीमध्ये, XEV 9e च्या 1,945 युनिट्स आणि BE 6 च्या 1,028 युनिट्स विकल्या गेल्या. विशेष म्हणजे 10 महिन्यांत, या SUV नी 32 कोटी किलोमीटरचे अंतर कापले आहे. म्हणजेच, सरासरी, प्रत्येक वाहनाने 7,800 किलोमीटरचे अंतर कापले आहे.

Mahindra BE 6: रेंज, बॅटरी आणि फीचर्स

कंपनीच्या दाव्यानुसार 79kWh बॅटरी पॅक असलेली BE 6 ईव्ही एका चार्जमध्ये 682 किमीपर्यंत धावू शकते. मात्र Auto Car India च्या चाचणीत या मॉडेलने सरासरी 449 किमी रेंज दिली. 59kWh व्हेरिएंटची दावा केलेली रेंज 535 किमी आहे.

चार्जिंगच्या बाबतीत BE 6 लवचिक पर्याय देते. 11kW AC चार्जरद्वारे ही ईव्ही सुमारे 6 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते. तसेच 140kW किंवा 175kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 20 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज करता येते.

Skoda Slavia Facelift लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, टेस्टिंग दरम्यान मिळाली ‘ही’ माहिती

फीचर्सच्या बाबतीत BE 6 मध्ये पॅनोरमिक ग्लास रूफ, एंबियंट लाईटिंग, 12.3-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 16-स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय 360° कॅमेरा, ड्युअल वायरलेस चार्जर, ADAS लेव्हल 2, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Mahindra XEV 9e: फीचर्स

Mahindra XEV 9e ची लांबी 4789 मिमी, रुंदी 1907 मिमी, उंची 1694 मिमी आणि व्हीलबेस 2775 मिमी आहे. ग्राउंड क्लिअरन्स 207 मिमी असून टर्निंग डायमीटर 10 मीटर आहे. या एसयूव्हीत 245/55 R19 (245/50 R20) टायर्स दिले आहेत. 663 लिटरचा बूट स्पेस आणि 150 लिटरचा फ्रंक (फ्रंट ट्रंक) उपलब्ध आहे.

59kWh बॅटरी पॅकसह 231hp/380Nm क्षमतेची मोटर दिली आहे. ही RWD (Rear Wheel Drive) ड्राइव्हसह येते. याची MIDC रेंज 542 किमी आहे. 140kW फास्ट चार्जरने 20 मिनिटांत चार्जिंग होते. तसेच 7.2kW चार्जरने 8.7 तासांत आणि 11kW चार्जरने 6 तासांत पूर्ण चार्ज होते.

79kWh व्हेरिएंटमध्ये 286hp/380Nm क्षमतेची मोटर असून हीदेखील RWD ड्राइव्हसह येते. याची MIDC रेंज 656 किमी आहे. 170kW फास्ट चार्जरद्वारे 20 मिनिटांत चार्जिंग शक्य आहे. 7.2kW चार्जरने 11.7 तास आणि 11kW चार्जरने 8 तासांत पूर्ण चार्ज होते. ही एसयूव्ही 0 ते 100 किमी प्रतितास वेग केवळ 6.8 सेकंदांत गाठते.

Web Title: Mahindra electric suv be 6 and xev 9e sales increased 41000 units sold in 10 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
1

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
2

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?
3

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख
4

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.