फोटो सौजन्य: iStock
कार घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असते पण जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा समजते की कार घेण्यापेक्षा तिला मेंटेन करणे फार कठीण असते. कार नवीन असते तेव्हा ती एकदम सुरळीत चालते पण एकदा का ती जुनी व्हायला लागली की तिचे पार्टस खराब होऊ लागतात. अशामुळे कार तर खराब होतेच पण हळूहळू इंजिन सुद्धा खराब होऊ लागते. यामुळे मग कारमधून विषारी वायू बाहेर पडतात ज्यामुळे वायू प्रदूषण होते.
2024 च्या दिवाळीपूर्वीच दिल्ली एनसीआर प्रदूषणामुळे समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत जर तुमची कार धावत असताना सामान्यपेक्षा जास्त धूर सोडत असेल तर त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करून दंडही लावू शकतात.
हे देखील वाचा: Renault India कडून भारतीय लष्कराला Kinger आणि Triber कार भेट !
अनेक वेळा कारचे ट्युनिंग बिघडते. त्यामुळे इंजिनपर्यंत फ्युएलचे प्रमाण पोहोचते आणि फ्युएल वापरण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. त्यामुळे फ्युएल पूर्णपणे जळत नाही आणि कार अधिक प्रमाणात प्रदूषण करू लागते. अशा परिस्थितीत, मेकॅनिकद्वारे ट्यूनिंग दुरुस्त केले जाऊ शकते.
ट्यूनिंग व्यतिरिक्त, इंजिनच्या कोणत्याही भागामध्ये काही बिघाड झाल्यास कार सामान्यपेक्षा जास्त प्रदूषण करू लागते. अशा परिस्थितीतही निष्काळजीपणा बाळगल्यास इंजिन सीज होण्याचा धोकाही वाढतो. यासाठीही तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमच्या कार चेक करून घ्यावी.
अनेकदा पेट्रोल पंपावर पुरेसे पेट्रोल मिळत नसल्याची तक्रार लोकं अनेकदा करतात. याशिवाय अनेक ठिकाणी इंधनातही भेसळ केली जाते. अशा पंपावर तुम्ही तुमच्या कारमध्ये भेसळयुक्त इंधन भरले तर त्यामुळे इंजिनचे नुकसान तर होतेच शिवाय कार चालवताना जास्त धूरही सोडते. अशा समस्या टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नेहमी जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करणे जिथे चांगल्या दर्जाचे पेट्रोल उपलब्ध आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी, कार उत्पादकांकडून सर्व कार्समध्ये कॅटेलिक कन्व्हर्टर बसवले जातात. कालांतराने आणि निष्काळजीपणामुळे हा भाग खराब होऊ लागतो. त्यात काही अडचण आली तर कार चालवताना नेहमीपेक्षा जास्त प्रदूषण उत्सर्जित करू लागते. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मेकॅनिककडे जाऊन साफ करता येते किंवा ते बदलून प्रदूषण कमी करता येते.