फोटो सौजन्य- सोशल मीडिया
रेनॉल्ट इंडियाकडून भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडला kiger आणि Triber सादर करण्यात आले आहेत. भारतीय सैन्यातील गतिशीलता आणि वाहतुकीला पाठिंबा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासंबंधी कंपनीने म्हटले आहे की, हा समुदायासाठी योगदान देण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक उपक्रम आहे.याआधीही रेनॉल्टने आपल्या तीन कार मॉडेल भारतीय सैन्याला बॅजसह सादर केले होते. कंपनीने 14 कॉर्प्स, नॉर्दर्न कमांडला वाहने पुरवली आहेत. अशारितीने कंपनीकडून सातत्याने लष्कराला सेवेकरिता वाहनांची भेट देण्यात येत आहे.
ही वाहने ईस्टर्न कमांडची गतिशीलता आणि लॉजिस्टिक क्षमता सुधारतील
“ही वाहने पुरवून भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडला पाठिंबा दिल्याबद्दल आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो. ट्रायबर आणि किगर गुणवत्ता, सुरक्षितता आणि मेक इन इंडिया उपक्रमासाठी रेनॉल्टची वचनबद्धता दर्शवतात. आम्हाला खात्री आहे की ही वाहने ईस्टर्न कमांडची गतिशीलता आणि लॉजिस्टिक क्षमता सुधारतील,” रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री सीईओ वेंकटराम एम. म्हणाले.त्यांनी असेही जोडले की कंपनी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित आहे आणि जे देशाचे रक्षण करतात त्यांना पाठिंबा देतात. हे योगदान भारतीय लष्कराच्या अमूल्य सेवेबद्दल ब्रँडच्या कौतुकाचा एक छोटीशी भेट आहे.
कारची किंमत
Renault Triber ची सध्या बाजारपेठेतील सुरुवातीची एक्स शो रुम किंमत ही 5.99 लाख रुपये असून या कारमध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर इंजिनसह येते. हे युनिट MT किंवा AMT सह जोडलेले आहे. तर Renault Kiger ची एक्स शो रुम किंमत ही 5.99 लाख रुपयांपासूनच सुरु होते. या कारच्या इंजिन पर्यायांमध्ये 1.0-लीटर एनए पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल समाविष्ट आहे. एन ( naturally aspirated engine) हे MT किंवा AMT सह जोडलेले आहे, तर टर्बो पेट्रोल MT किंवा CVT सह जोडलेले आहे. ज्या ग्राहकांना 6 लाखांपर्यंत कार विकत घ्यायची असल्यास या दोन्ही कार या उत्तम पर्याय ठरु शकतात.
Renault Kiger आणि Triber ही कंपनीची दोन्ही प्रमुख मॉडेल्स देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेतच तसेच .एक मॉडेल म्हणजे लहान हॅचबॅक क्विड ही कारही भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे.