Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

September 2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या बाबतीत कोणत्या कंपनीने मारली बाजी?

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटच्या विक्रीबाबत FADA ने एक महत्वाचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये विक्री कशी झाली आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 08, 2024 | 06:21 PM
फोेटो सौजन्य: iStock

फोेटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्यामुळे अनेक जण सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांना मेंटेन ठेवण्यासाठी जास्त खर्च लागत नसल्यामुळे सुद्धा या वाहनांची विक्री वाढताना दिसत आहे.

आधी फक्त इलेक्ट्रिक कार्सच लाँच होत होत्या, परंतु आता इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कुटर्स सुद्धा लाँच होत आहे. नुकतेच FADA म्हणजे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या कंपनीने किती इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झाली आहे, त्याबद्दल या बातमीत आपण जाणून घेऊया.

एकूण किती विक्री झाली आहे?

FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 90007 युनिट्सची विक्री झाली आहे. अहवालानुसार, यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये विक्रीची संख्या 88472 युनिट्स होती. FADA अहवालानुसार, मासिक आधारावर विक्रीत 1.74 टक्के वाढ झाली आहे आणि वार्षिक आधारावर 40.45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर्स विकण्यात बाजी मारली आहे.

हे देखील वाचा: TATA off-road SUV होणार जानेवारी 2025 मध्ये लाँच, Mahindra Thar ला मिळणार कांटे की टक्कर

Ola Electric पहिल्या नंबरवर

यंदा इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या कंपनीज मार्केटमध्ये जरी येत असल्या तरी ओला इलेक्ट्रिकने विक्रीच्या बाबतीत पहिले स्थान प्राप्त केले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 24679 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 25517 युनिट्सची विक्री झाली आहे. आकडेवारीनुसार, मासिक आधारावर कंपनीची 10.31 टक्के विक्री कमी झाली आहे. परंतु वार्षिक आधारावर सुमारे 32 टक्के वाढ झाली आहे.

Bajaj Auto दुसऱ्या क्रमांकावर

बजाज इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चेतक देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 19137 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये ही संख्या 16706 युनिट होती. कंपनीने वार्षिक आधारावर 169 टक्क्यांहून अधिकची वाढ केली आहे.

Top-3 मध्ये TVS

iQube मालिका या विभागात TVS द्वारे ऑफर केली जाते. विक्रीच्या बाबतीत टीव्हीएसचा टॉप-3 मध्ये समावेश झाला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 18108 युनिट्सची विक्री झाली आहे. तर यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 17543 युनिट्सची विक्री केली होती. मासिक आधारावर कंपनीने तीन टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. तर वार्षिक आधारावर TVS ने 15.96 टक्के वाढ नोंदवली आहे.

Ather Energy ची विक्री सुसाट

बेंगळुरू-आधारित स्टार्टअप आणि इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक अथरने गेल्या महिन्यात 12718 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 10830 युनिट होती. वार्षिक आधारावर, Ather ने 76.76 टक्के वाढ मिळवली आहे.

Top-5 मध्ये Hero Motocorp चा नंबर

FADA ने जाहीर केलेल्या यादीनुसार हिरो मोटोकॉर्पचाही टॉप-5 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 4310 युनिट्सची विक्री झाली आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये 4742 युनिट्सची विक्री झाली. आकडेवारीनुसार, Hero च्या मासिक विक्रीत 9.11 टक्क्यांनी घट झाली असून वार्षिक आधारावर कंपनीची विक्री तब्बल 708.63 टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: In september 2024 which company sold most numbers of electric scooters in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • electric scooter
  • record sales

संबंधित बातम्या

BMW India Record Sales: BMW Group India ची विक्रमी वार्षिक कामगिरी; 18,001 कार विक्रीसह 14% वाढ
1

BMW India Record Sales: BMW Group India ची विक्रमी वार्षिक कामगिरी; 18,001 कार विक्रीसह 14% वाढ

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
2

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री
3

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास
4

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.