फोटो सौजन्य: Social Media
टाटा मोटर्स हे एक असे नाव आहे ज्याशिवाय भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र पूर्ण होऊ शकतात नाही. आजही कित्येक कार खरेदीदार डोळे झाकून टाटाच्या कार्सवर विश्वास ठेवत असतात. सध्या ही ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर आपले लक्ष केंद्रित करत आहे.
टाटा मोटर्सच्या कार्सना नेहमीच मागणी पाहायला मिळते. कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कार्स लाँच करत असतात. टाटा बजेट कार्सपासून ते हाय परफॉर्मन्स कार्स सुद्धा लाँच करत असतात. ज्यामुळे ते प्रत्येक वर्गाला आकर्षित असतात. तसेच ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स सुद्धा कंपनीकडून दिले जाते.
आता नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी जानेवारी 2025 मध्ये लवकरच ऑफ रोड एसयूव्ही लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपली फ्लॅगशिप SUV Tata Harrier ची AWD व्हर्जन आणण्याची योजना आखत आहे. यामुळे नक्कीच महिंद्रा थारला चांगलीच टक्कर मिळणार आहे.
ICE आवृत्ती Harrier व्यतिरिक्त, कंपनी AWD क्षमतेसह इलेक्ट्रिक व्हर्जन Harrier आणू शकते. त्याचे कंसेप्ट व्हर्जन देखील टाटा यांनी भारत मोबिलिटी दरम्यान फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित केले होते. ऑफ-रोडिंगसाठी हॅरियर ईव्हीमध्ये काही विशेष मोड दिले जाऊ शकतात.
ऑफ-रोडिंग Harrier EV बद्दल कंपनीने अद्याप सार्वजनिकपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी कार्यक्रमादरम्यान त्याचे प्रोडक्शन व्हर्जन सादर केले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. त्यानंतर काही वेळाने ही कार लाँच केले जाईल.
टाटाने AWD क्षमतेसह Harrier EV आणल्यास, ती बाजारात थेट महिंद्रा थारशी स्पर्धा करेल. सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये, टाटा एसयूव्ही सेगमेंटमध्ये पंच, नेक्सॉन, कर्व्हव्ही, हॅरियर आणि सफारी ऑफर करते. परंतु कोणतीही SUV ऑफ-रोडिंग AWD क्षमतेसह येत नाही.