Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातून जगभर कार निर्यातीत मोठी झेप; जपानसह 100 हून अधिक बाजारपेठांमध्ये प्रवेश

FY26 मध्ये भारताने 9 अब्ज डॉलर किमतीच्या आणि 9.05 लाखांहून अधिक प्रवासी वाहनांची निर्यात करून विक्रम नोंदवला. दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि मेक्सिको हे प्रमुख बाजार ठरले, तर जपानमध्ये वाढलेली मागणी भारताच्या वाहन गुणवत्तेची जागतिक पातळीवरील मान्यता मानली जात आहे. भारतीय कार आता जगभर पोहोचत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 16, 2026 | 09:14 PM
भारतातून जगभर कार निर्यातीत मोठी झेप; जपानसह 100 हून अधिक बाजारपेठांमध्ये प्रवेश
Follow Us
Follow Us:

भारताची ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रातील ताकद आता केवळ देशांतर्गत बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतीय कार आता आफ्रिका, मध्यपूर्व, लॅटिन अमेरिका, युरोप आणि अगदी जपानसारख्या विकसित देशांमध्येही पोहोचत आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मधील आकडेवारीनुसार भारताच्या कार निर्यातीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

HS Code 8703 अंतर्गत उपलब्ध माहितीनुसार, FY26 मध्ये भारताने सुमारे 9 अब्ज डॉलर किमतीच्या प्रवासी वाहनांची निर्यात केली. ही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, SIAM च्या अहवालानुसार भारतातून 9.05 लाख प्रवासी वाहनांची निर्यात झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे.

भारतातून सर्वाधिक कार निर्यात होणारा देश म्हणजे दक्षिण आफ्रिका ठरला. या देशाकडे 1.50 अब्ज डॉलर किमतीच्या कार पाठवण्यात आल्या, ज्याचा एकूण निर्यातीतील वाटा 16.6 टक्के आहे. परवडणाऱ्या, इंधन-कार्यक्षम आणि मजबूत वाहनांची मागणी असल्यामुळे भारतीय कार तेथे लोकप्रिय ठरत आहेत.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या यशात सिंहाचा वाटा असणारे हे ‘दिग्गज अभियंते’ तुम्हाला माहित आहेत का?

दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया असून, भारताने तेथे 1.26 अब्ज डॉलर किमतीची वाहने निर्यात केली. तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे, जिथे 1.12 अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय कार विकल्या गेल्या. दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि मेक्सिको या तीन देशांचा मिळून भारताच्या एकूण कार निर्यातीमध्ये जवळपास 43 टक्के वाटा आहे.

विशेष म्हणजे जपान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. FY26 मध्ये भारताने जपानला 0.81 अब्ज डॉलर किमतीच्या कार निर्यात केल्या. जपान हा गुणवत्ता, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी जगातील सर्वात कठोर बाजारांपैकी एक मानला जातो. त्यामुळे भारतीय वाहनांना जपानमध्ये मिळालेली स्वीकारार्हता ही भारतासाठी मोठी उपलब्धी मानली जाते.

हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप

याशिवाय यूएई, चिली, स्पेन, पेरू, श्रीलंका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमध्येही भारतीय कारची मागणी वाढत आहे. यावरून भारताची निर्यात कोणत्याही एका प्रदेशावर अवलंबून नसून जागतिक स्तरावर विस्तारत असल्याचे दिसते.

मारुती सुझुकी, ह्युंदाई, निसान, टोयोटा आणि फोक्सवॅगन यांसारख्या कंपन्या भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करत आहेत. कमी उत्पादन खर्च, सुधारलेली गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांमुळे भारतीय कार जगभरात अधिक स्वीकारल्या जात आहेत. त्यामुळे भारत आता केवळ मोठी वाहन बाजारपेठ नसून जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

 

Web Title: Indian automobile export data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

मोठे सनरुफ असलेली कार घ्यायचीय? या आहेत  जगातील सर्वात मोठ्या सनरुफ असलेल्या कार! पाहा एका क्लिकवर
1

मोठे सनरुफ असलेली कार घ्यायचीय? या आहेत जगातील सर्वात मोठ्या सनरुफ असलेल्या कार! पाहा एका क्लिकवर

‘टॅक्सी कार’ म्हणून वापरल्या जातात या लोकप्रिय कार! आत्ताच जाणून घ्या
2

‘टॅक्सी कार’ म्हणून वापरल्या जातात या लोकप्रिय कार! आत्ताच जाणून घ्या

फॉर्म्युला1 कार रेस जिंकणारे ‘पहिले भारतीय’ तुम्हाला माहित आहेत का? ‘नारायण कार्तिकेयन’ यांची प्रेरणादायी गोष्ट
3

फॉर्म्युला1 कार रेस जिंकणारे ‘पहिले भारतीय’ तुम्हाला माहित आहेत का? ‘नारायण कार्तिकेयन’ यांची प्रेरणादायी गोष्ट

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या यशात सिंहाचा वाटा असणारे हे ‘दिग्गज अभियंते’ तुम्हाला माहित आहेत का?
4

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या यशात सिंहाचा वाटा असणारे हे ‘दिग्गज अभियंते’ तुम्हाला माहित आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.