फोटो सौजन्य: @indianmotocycle/ X.com
भारतीय मार्केटमध्ये बाईक खरेदी करताना पूर्वी फक्त त्याच्या किमतीकडे लक्ष दिले जायचे. मात्र, आजच्या खरेदीदरला त्याची बाईक फक्त परफॉर्मन्समध्येच नाही तर लूकमध्ये सुद्धा आकर्षक हवी आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार लूक आणि परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक्स ऑफर करत असतात. अशातच Indian Motorcycle या आघाडीच्या प्रीमियम बाईक उत्पादक कंपनीने मार्केटमध्ये त्याच्या बाईक अपडेट केल्या आहेत.
भारतातील प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी इंडियन मोटरसायकलने त्यांचे अनेक मॉडेल अपडेट केल्यानंतर लाँच केले आहेत. कंपनीने कोणत्या बाईक्स अपडेट केल्या आहेत? त्यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? इंजिन किती पॉवरफुल आहे? त्या कोणत्या किंमतीला लाँच केल्या आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘या’ कारची किल्ली असेल तुमच्या हातात, किती असेल EMI?
इंडियन मोटरसायकलने आपल्या अनेक मॉडेल्सना अपडेट करून बाजारात सादर केले आहे. कंपनीने स्काऊट सिरीजमध्ये सुमारे आठ मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
इंडियनकडून दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने एकूण आठ मॉडेल्सना अपडेट दिले आहेत. यामध्ये Scout Sixty Bobber, Sport Scout Sixty, Scout Sixty Limited, Scout Bobber, Scout Classic, Sport Scout, 101 Scout आणि Super Scout यांचा समावेश आहे.
निर्मात्याकडून या मॉडेल्समध्ये एबीएस, एलईडी लाईट्स, ॲनालॉग स्पीडोमीटर, यूएसबी चार्जर, रायडिंग मोड्स, 16-इंच व्हील्स, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, यूएसडी फॉर्क्स अशा अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
इंडियनने मोटरसायकलमध्ये 999 सीसी क्षमतेचे स्पीड प्लस इंजिन दिले आहे, ज्यामुळे त्यांना 85 हॉर्सपॉवरची ताकद आणि 87 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. या इंजिनसोबत 5-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. त्यामुळे वी-ट्विन इंजिनचा खास आवाज आणि लिक्विड कूल्ड परफॉर्मन्स अनुभवता येतो.
याशिवाय, काही मॉडेल्सना 999 सीसीसोबतच 1250 सीसी क्षमतेचे स्पीड प्लस इंजिनसुद्धा देण्यात आले आहे.
निर्मात्याने या बाईक्स 12.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केल्या आहेत. ही किंमत त्यांच्या स्काउट सिक्स्टी बॉबर बाईकची आहे. या सिरीजमधील सर्वात महागड्या बाईकची एक्स-शोरूम किंमत 16.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईक्ससह इंडियनने पॅकेज पर्याय देखील प्रदान केले आहेत.