iPhone 17 Pro Max च्या किमतीत येईल Royal Enfield ची 'ही' बाईक
मार्केटमध्ये iPhone 17 लाँच झाला आणि सगळीकडेच त्याची चर्चा सुरु झाली. मुंबईतील बीकेसी येथे तर हा आयफोन खरेदी करण्यासाठी लोकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या. खरंतर, आयफोन त्याच्या कॅमेरा क्वालिटीसोबतच महागड्या किमतीसाठी देखील ओळखला जातो. सध्या iPhone 17 Pro Max ची किंमत दीड लाख दरम्यान आहे. याच किमतीत तुम्ही चक्क Royal Enfield Bullet 350 खरेदी करू शकता, त्यात नवीन GST दरांमुळे तर आता या बाईकची किंमत अजूनच कमी झाली आहे.
सरकारने 350cc पर्यंतच्या बाईक्सवरील जीएसटी दर 28 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के केला आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत थेट 8.2 टक्क्यांनी कमी झाली असून ग्राहकांच्या साधारण 14 हजार ते 20 हजार रुपयांची बचत होणार आहे. अशा परिस्थितीत आता बुलेट 350 किती स्वस्त मिळणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Royal Enfield Bullet 350 ची सुरुवातीची किंमत आता फक्त 1.62 लाख रुपये झाली आहे. ही किंमत iPhone 17 Pro Max पेक्षा थोडी महाग आहे. या फोनची किंमत सुमारे 1.50 लाख रुपये आहे. बुलेट 350 ची ही किंमत एक्स-शोरूम आहे. ऑन-रोड किंमतीत RTO, विमा आणि इतर शुल्काचा समावेश होतो.
बुलेट 350 मिलिटरी ब्लॅक/रेड वेरिएंटची जुनी किंमत 1.76 लाख रुपये होती. आता या वेरिएंटवर 13,775 रुपयांची बचत होत असून त्याची नवी किंमत 1.62 लाख रुपये आहे.
बुलेट 350 स्टँडर्ड (ब्लॅक) व्हेरिएंटची जुनी किंमत 2,00,950 रुपये होती. जीएसटी कपातीनंतर ती आता 1.85 लाख रुपये झाली आहे.
स्टँडर्ड मॅरून वेरिएंटची नवीन किंमत 1.85 लाख रुपये तर ब्लॅक गोल्ड वेरिएंटची किंमत अंदाजे 2.02 लाख रुपये आहे.
GST Rate कमी झाल्याने तरुणाची धडकन असणाऱ्या Kawasaki Bikes किती स्वस्त झाल्या?
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ला Honda H’ness CB350 आणि CB350 RS यांसारख्या बाईक्सकडून थेट स्पर्धा मिळते. याशिवाय जावा 42, येझदी रोडकिंग आणि BSA Gold Star 650 हेदेखील या सेगमेंटमध्ये बुलेटच्या प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.