फोटो सौजन्य: @talk2anuradha/X.com
भारतात नेहमीच लक्झरी कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. एवढेच काय तर आजही एखाद्या रस्त्यावर लक्झरी कार धावताना दिसली की अनेकांच्या नजारा त्या कारवर रोखल्या जातात. अशीच एक लक्झरी कार उत्पादक कंपनी म्हणजे Rolls-Royce.
आज बहुतेक उद्योगपती आणि सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयसच्या कार हमखास पाहायला मिळतात. मात्र, या महागड्या कार चालवण्यासाठी आपल्या उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर सुविधा आहेत का? असाच काहीसा प्रश्न X म्हणजेच ट्विटरवर एका युझरला पडला आहे. याचे कारण म्हणजे रस्त्यावर तुडुंब भरलेल्या पाण्यात बंद पडलेली रोल्स रॉयस कार.
अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पाऊस आणि खराब इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमुळे Rolls Royce Ghost सारख्या महागड्या कारचे नुकसान झाले आहे.
Car price – 10 Crore
Infrastructure – ZERO You pay crores to buy your dream car, only to drive on pathetic infrastructure. pic.twitter.com/8YA5cCph6d — Anuradha Tiwari (@talk2anuradha) September 23, 2025
हा व्हिडिओ अनुराधा तिवारी नावाच्या युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर अडकलेली रोल्स-रॉइस घोस्ट सिरीज 2 कार दाखवण्यात आली आहे. कॅप्शननुसार, ही घटना कोलकातामध्ये घडली आहे, जिथे 37 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडत आहे.
GST Rate कमी झाल्याने तरुणाची धडकन असणाऱ्या Kawasaki Bikes किती स्वस्त झाल्या?
एका युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “कारची किंमत -10 कोटी, इन्फ्रास्ट्रक्चर – शून्य. तुम्ही तुमची स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करता आणि नंतर ती खराब इन्फ्रास्ट्रक्चरवर चालवावी लागते.”
व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की संपूर्ण देश सरकारकडून कॉर्पोरेटसाठी होणाऱ्या जंगलतोडीची किंमत चुकवत आहे.
दुसऱ्या युजरच्या मते, हे विसरू नका की त्यांनी ‘रोड टॅक्स’, ‘लाईफ टॅक्स’, ‘जुनी जीएसटी व्यवस्था’ यासाठी कित्येक कोटी रुपये भरले असतील. मग ते नेमके कुठे खर्च झाले?
तर आणखी एका युजरने लिहिले, यातूनच सगळं काही स्पष्ट होतं. वेगळ्या स्पष्टीकरणाची गरजच नाही. पण ही केवळ कोलकात्याचीच नाही तर पावसाळ्यात जवळपास संपूर्ण देशाचीच अवस्था आहे.