फोटो सौैजन्य: iStock
बाईक असो की कार, पूर्वी कोणतेही वाहन खरेदी करताना आपल्याला 28 टक्के जीएसटी द्यावा लागत असे. मात्र, जीएसटीत बदल होणार असल्याची घोषणा झाली आणि ऑटो क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पूर्वी ज्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. त्याच वाहनांवर आता 18 टक्के GST द्यावा लागणार आहे. यामुळे अनेक लोकप्रिय बाईकच्या किमतीत घट झाली आहे.
देशात अनेक वर्षांपासून कावासाकी स्पोर्ट बाईक ऑफर करत असते. कंपनीच्या बहुतेक बाईक या महाग असतात. मात्र, आता नवीन जीएसटी दरांमुळे कंपनीच्या 350cc पेक्षा कमी क्षमता असणाऱ्या बाईकची किंमत कमी झाली आहे. तर दुसरीकडे, 400cc पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या बाईकच्या किमतीत वाढ होणार आहे.
नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?
कावासाकीने आपल्या W175 सीरिज बाईक्सच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत आता ग्राहकांना या मॉडेल्स अधिक किफायतशीर दरात मिळणार आहेत. उदाहरणार्थ, W175 MY23 ची जुनी किंमत ₹1,22,000 होती, जी आता ₹1,13,000 इतकी करण्यात आली आहे, म्हणजेच ₹9,000 ने स्वस्त झाली आहे. त्याचप्रमाणे SPLC & G MY23 ची किंमत ₹1,24,000 वरून ₹1,15,000 वर आली असून यातही ₹9,000 ची बचत होते. नवीन MY24 मॉडेलची किंमत ₹1,29,000 वरून ₹1,19,000 इतकी करण्यात आली आहे, तर SPLC & G MY24 पूर्वीच्या ₹1,31,000 ऐवजी आता ₹1,21,000 मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना ₹10,000 पर्यंत फायदा होतो. तसेच Street MY24 मॉडेलची किंमतही ₹1,35,000 वरून ₹1,25,000 वर आणली आहे, म्हणजेच ₹10,000 ने स्वस्त झाली आहे.
जीएसटीमध्ये बदल केल्यामुळे, W175, KLX230, Ninja 300 आणि Veys-X 300 सारख्या कावासाकी बाईक्स आता पूर्वीपेक्षा स्वस्त झाल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, KLX230 आता भारतात स्थानिक पातळीवर असेंबल केले जाते, तर उर्वरित बाइक्स पूर्णपणे CBU म्हणून आयात केल्या जातात.
BSA च्या ‘या’ खास बाईकवर दमदार डिस्काउंट, पैश्यांची बचतच बचत होणार
या किमतीत कपातीचा फायदा ग्राहकांना विशेषतः सणासुदीच्या काळात होईल. उदाहरणार्थ, 2026 ची कावासाकी KLX230 आता आणखी परवडणारी बनली आहे, ज्यामुळे ती ऑफ-रोड उत्साही लोकांसाठी एक उत्तम पर्याय बनली आहे. Ninja 300 ची नवीन किंमत देखील 2021 मध्ये लाँच झालेल्या BS6 व्हर्जनच्या किमतीइतकीच आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वात परवडणाऱ्या ट्विन-सिलेंडर बाईक्सपैकी एक बनली आहे. तसेच, अजून कोणत्या बाईक किती रुपयांनी कमी झाल्या आहेत, याची माहिती तुम्ही कावासाकीच्या शोरूमला भेट देऊन मिळवू शकता.