Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयवूमी एनर्जीने ई-मोबिलिटीमध्ये उचलले महत्त्वाकांक्षी पाऊल

पुण्यामध्ये तयार केला जाणार असलेला उत्पादन प्लांट या कंपनीचा भारतातील चौथा प्लांट असणार आहे. संपूर्णपणे एकात्मिक इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लांट मार्च २०२३ पासून सुरु होईल. या प्लांटमुळे कंपनीत स्थानिक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील, याठिकाणी २,००० हुन जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 18, 2022 | 09:13 PM
ivoomi energy to invest rs 200 crore to set up a new manufacturing facility in pune nrvb

ivoomi energy to invest rs 200 crore to set up a new manufacturing facility in pune nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली एक इलेक्ट्रिक कंपनी (EV Company) आयवूमी एनर्जीने (ivoomi energy) संशोधन व विकास आणि महाराष्ट्रात पुण्यामध्ये एक नवा उत्पादन प्लांट तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक (invest rs 200 crore) करून विस्तार करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने किफायतशीर किमतींमध्ये उपलब्ध करवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या संशोधन व विकास सुविधा वाढवण्यासाठी कंपनी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.

पुण्यामध्ये (Pune) तयार केला जाणार असलेला उत्पादन प्लांट या कंपनीचा भारतातील चौथा प्लांट असणार आहे. संपूर्णपणे एकात्मिक इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लांट मार्च २०२३ पासून सुरु होईल. या प्लांटमुळे कंपनीत स्थानिक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील, याठिकाणी २,००० हून जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील.

कंपनी करत असलेली ही गुंतवणूक त्यांची उत्पादन क्षमता ६०,००० हुन जास्त युनिट्सपर्यंत वाढवेल, त्यामुळे त्यांचे उत्पादन दरवर्षी १,८०,००० ते २,४०,००० युनिट्स इतके वाढेल. आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत २,००,००० हुन जास्त युनिट्स रोल आउट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही कंपनी आगेकूच करत आहे.

आयवूमीचे सीईओ आणि सह-संस्थापक अश्विन भंडारी यांनी सांगितले, “इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सरकारच्या भविष्यवेधी उद्दिष्टांना अनुसरून आम्ही ग्राहकांसाठी किफायतशीर उत्पादने बनवण्यासाठी नव्या संशोधन व विकास सुविधा आणि उत्पादन युनिट्स सुरु करून तसेच भविष्यात या उद्योगक्षेत्रात निर्माण होतील अशा मागण्यांवर लक्ष केंद्रित करत ईव्ही इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत. आम्ही असे मानतो की, या उद्योगक्षेत्रात विकास आणि नावीन्यपूर्णतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि याठिकाणी एक मानदंड निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत लक्षणीय विकास करण्यासाठी आम्ही संशोधन व विकास आणि व्यापार विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

आयवूमीचे एक संशोधन व विकास युनिट पुण्यामध्ये आधीपासून कार्यरत आहे. नोएडा, पुणे आणि अहमदनगरमध्ये त्यांच्या उत्पादन सुविधांमध्ये दर दिवशी ५०० इलेक्ट्रिक स्कुटर्स तयार करण्याची क्षमता आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या समर्थनार्थ, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या इन-हाऊस तयार करणाऱ्या अतिशय मोजक्या कंपन्यांपैकी एक आयवूमी आहे. ही कंपनी एका व्यापक उत्पादन विकास धोरणावर काम करत आहे, ज्यामध्ये भविष्यासाठी सज्ज काही उत्पादने बाजारपेठेत दाखल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने काही महत्त्वाचे विकास केले आहेत, ज्यांच्यावर अद्याप काम सुरु आहे. रायडर्सना बॅक सपोर्टसाठी एक्सक्लुसिव्ह बी२बी ॲक्सेसरीज आणि इन्स्टॉल करायला अगदी सहजसोप्या मॉड्यूलसारखे काही ऍड-ऑन आहेत जे दुचाकी ग्राहकांना खूपच फायदेशीर ठरतील.

Web Title: Ivoomi energy to invest rs 200 crore to set up a new manufacturing facility in pune nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 09:10 PM

Topics:  

  • Pune
  • set up

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.