Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत दोन भावांनी २१ वर्षीय तरुणीच्या आई-भावाच्या डोळ्यात तिखट फेकून तिचे अपहरण केल्याची घटना घडली. प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करत तरुणीचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 08:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आई-भावावर हल्ला करून तरुणीचे दिवसाढवळ्या अपहरण.
  • आरोपी दोघे सख्खे भाऊ; अपहरणाचा गुन्हा दाखल.
  • पोलिसांकडून नाकाबंदी व शोधमोहीम सुरू.
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिगवण बाजारपेठेत दिवसाढवळ्या २१ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणीसोबत तिची आई आणि भाऊ होता. त्यांच्या डोळ्यात आरोपींनी लाल तिखट फेकून तीच अपहरण केलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून मुलीचे दोघे सख्खे भाऊ असल्याचे असे समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी ही दौंड तालुक्यातील शेख वस्तीची रहिवासी आहे. तिचा काही दिवसात विवाह होणार होता. त्यासाठी पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेत काही खरेदीसाठी आली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली. पीडित मुलीचा भाऊ आणि आई यांच्या डोळ्यात लाल तिखट फेकलं. मुलीच्या आईला मारहाण केली आणि मुलीला घेऊन पसार झाले.

Jalgaon Crime: पोलीस दलाच्या पंपात आर्थिक घोटाळा! १.३३ कोटींचा गैरव्यवहार उघड; आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार

याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे जहीर हारुन शेख आणि आयन हारुन शेख अशी आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून पोलीस पथक तरुणीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. पीडित मुलीच्या नातलगाने आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.

भिगवण बंदची हाक

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामस्थ संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. त्यानंतर काही काळ पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला होता. आता वाहतूक सुरळीत झाली असली तरी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर पकडावं, या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता आरोपींना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे शहरातील ड्रग्जचा पुरवठा सुरूच असून, पोलिसांकडून पाळेमुळे शोधली जात असतानाच ‘ड्रग्ज तस्करी राजस्थान व्हाया पुणे’ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थोडथोड्या प्रमाणात राजस्थानातून पुण्यात ड्रग्ज आणून त्याची विक्री होत असल्याचे कारवाईतून समोर आले. पोलिसांनी शहरात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करत ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ९२ लाख रुपयांचा एमडी हा ड्रग्ज जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली. यावेळी परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत ही घटना घडली.

  • Que: अपहरण कसे करण्यात आले?

    Ans: आरोपींनी आई-भावाच्या डोळ्यात तिखट फेकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन पळ काढला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून जिल्हाभर नाकाबंदी करत तरुणीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Pune crime shocking young woman kidnapped in broad daylight in market red ink and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…
2

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
3

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी
4

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.