Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

जावाची खास ‘ऑल स्टार्स ४२ बॉबर’ भारतीय बाजारात दाखल झाली आहे. २.०८ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या बाईकला चेस-थीमवर आधारित डिझाइन, खास रंग आणि दमदार ३३४ सीसी इंजिन मिळते. मात्र, या स्पेशल एडिशनच्या वाढलेल्या किमतीमागे नेमके काय खास आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 05, 2026 | 10:36 PM
Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • आनंद महिंद्रा यांच्या हस्ते नवीन जावा ‘ऑल स्टार्स ४२ बॉबर’ बाईक भारतात २,०८,९४२ रुपयांत लाँच करण्यात आली.
  • यात बुद्धीबळ संकल्पनेवर आधारित स्पोर्टी डिझाइन, नवीन सिल्व्हर नाइट रंग आणि विशेष ‘ऑल स्टार्स’ लोगो मिळतो.
  • या बाईकमध्ये ३३४ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन, ६-स्पीड गिअरबॉक्स आणि ड्युअल-चॅनेल ABS सुरक्षा सिस्टीम देण्यात आली आहे.

जावा मोटरसायकलने बंगळुरू येथे आयोजित ‘ग्लोबल चेस लीग २०२६’ दरम्यान आपली नवीन स्पेशल एडिशन ‘ऑल स्टार्स ४२ बॉबर’ ऑफीशली लाँच केली आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या हस्ते या बाईकचे अनावरण करण्यात आले. ही बाईक ब्रँडच्या ‘ऑल स्टार्स’ चॅप्टरअंतर्गत येणारी दुसरी मोटरसायकल ठरली आहे. दिल्लीमध्ये या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २,०८,९४२ रुपये ठेवण्यात आली असून, ती भारतातील सर्व जावा येझदी डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

स्ट्रक्चर आणि डिझाइनमधील बदल

नवीन ऑल स्टार्स ४२ बॉबरचा मूळ ‘फॅक्टरी-कस्टम’ लुक कायम ठेवण्यात आला आहे, परंतु बुद्धीबळाच्या थीमवर आधारित काही खास स्टायलिंग फीचर्स जोडण्यात आले आहेत. यामध्ये फ्लोटिंग सिंगल-सीट लेआउट, कॅन्टिलीव्हर रिअर सेक्शन आणि लो-स्लंग फिनिश पाहायला मिळते. या स्पेशल एडिशनमध्ये ‘चेकर्ड’ (चेस-बोर्ड सारखी) ग्राफिक्स, विशेष ‘ऑल स्टार्स’ लोगो आणि बुद्धीबळ व बायकिंगच्या थीमवर आधारित नवीन ‘सिल्व्हर नाइट’ रंग सादर करण्यात आला आहे.

याशिवाय ही कार ब्लॅक मिरर, शॅडो ब्लॅक, जॅस्पर रेड आणि मिस्टिक कॉपर अशा इतर आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यापैकी शॅडो ब्लॅक व्हेरियंटला मॅट-ब्लॅक फिनिश देण्यात आले आहे. ४२ बॉबरने तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि रोड प्रेझेंससाठी २०२६ मध्ये ‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर’चा पुरस्कारही पटकावला आहे.

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

व्हेरियंटनुसार एक्स-शोरूम किमती (नवी दिल्ली):

  • All Stars Mystic Copper: ₹ २,०८,९४२
  • All Stars Jasper Red: ₹ २,१५,९४२
  • All Stars Shadow Black: ₹ २,१७,९४२
  • All Stars Black Mirror: ₹ २,१९,९४२
  • All Stars Silver Knight: (किंमत लवकरच जाहीर होईल)
इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाईकच्या मेकॅनिकल भागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात तोच ३३४ सीसी चा सिंगल-सिलेंडर, फोर-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड DOHC पेट्रोल इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन ७,५०० आरपीएमवर २९.९ पीएस ची कमाल पॉवर आणि ५,५०० आरपीएमवर ३०.०१ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते. यात इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आणि ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकचे वजन १७७ किलो असून, यात १२.५ लिटरची इंधन टाकी आणि ड्युअल एक्झॉस्ट (दोन सायलेंसर) मिळतात.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टीम

  • फ्रेम व सस्पेंशन: डबल-क्रॅडल फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये पुढे ३५ मिमी टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागे ७-स्टेप प्रीलोड अॅडजस्टमेंटसह गॅस-फिल्ड मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे.
  • ब्रेक्स: सुरक्षिततेसाठी पुढे २८० मिमी डिस्क आणि मागे २४० मिमी डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनेल ABS देण्यात आला आहे.
  • टायर्स व परिमाणे: यात १८-इंच फ्रंट आणि १७-इंच रिअर टायर्स आहेत. बाईकचा व्हीलबेस १,४८५ मिमी, सीटची उंची ७४० मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स १४५ मिमी आहे.
भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

विशेष ऑनरशिप प्रोग्राम

कंपनी या ऑल स्टार्स ४२ बॉबरसोबत ‘ओनरशिप अॅश्युरन्स प्रोग्राम’ देत आहे. याअंतर्गत ४ वर्षे किंवा ५०,००० किमीची स्टँडर्ड वॉरंटी, ६ वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटीचा पर्याय, ८ वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स आणि ५ वर्षांपर्यंत AMC कव्हरेज दिले जात आहे. सध्या भारतात जावा येझदीचे ४५० हून अधिक सेल्स आणि सर्व्हिस नेटवर्क उपलब्ध आहेत.

Web Title: Jawa all stars 42 bobber launched in india price specs auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 10:36 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
1

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
2

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
3

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
4

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.