
टेस्ट राइड घेऊन मोटरसायकल जिंकण्याची सुवर्णसंधी! ( सौजन्य - सोशल मीडिया )
ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून कलाकारांसाठी 60 लाखांचे अनुदान; ‘आर्ट फॉर होप’चा सीझन 6 सुरू
ग्राहकांसाठी विविध फायनान्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रति लाख रुपयांमागे केवळ 1,888 रुपयांपासून सुरू होणारा मासिक हप्ता (ईएमआय), 4.75 टक्क्यांपासून सुरू होणारा व्याजदर आणि केवळ 4,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या डाउन पेमेंटचा समावेश आहे.
या फायनान्स पर्यायांमुळे ग्राहकांना मोटरसायकल खरेदीचे नियोजन अधिक लवचिकपणे करता येणार असून, अनेक दिवसांपासून स्वतःची मोटरसायकल घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ते अधिक सोपे होणार आहे. जावा, येझदी किंवा बीएसएची मोटरसायकल खरेदी करणे म्हणजे केवळ एक वाहन निवडणे नव्हे, तर तिचे वेगळेपण, खास शैली आणि परंपरा आपल्या जीवनाचा भाग बनवणे होय. जावाची कालातीत आकर्षक शैली, येझदीचा धाडसी आणि साहसी स्वभाव किंवा बीएसएची ब्रिटिश बनावटीची उत्कृष्ट परंपरा, प्रत्येक ब्रँड रायडर्सना आपली ओळख आणि राइडिंगची खास शैली व्यक्त करण्याची वेगळी संधी देतो.
‘टेस्ट राइड घ्या आणि तुमची स्वप्नातील बाईक जिंका’ या मोहिमेमुळे यंदाच्या सणासुदीच्या काळात मोटरसायकल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन या मोटरसायकल्सची प्रत्यक्ष टेस्ट राइड घेण्याची आणखी एक चांगली संधी मिळणार आहे.
क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “अनेकांसाठी मोटरसायकल खरेदीचे स्वप्न एखादी बाईक रस्त्यावर पाहिल्याने, ऑनलाइन तिच्याबद्दल माहिती मिळाल्याने किंवा मित्राच्या मोटरसायकलचा अनुभव घेतल्याने सुरू होते. यंदाच्या दिवाळीत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे अधिक सोपे व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे”.
“आमच्या सणासुदीच्या विशेष ऑफर्समागील उद्देश ग्राहकांना त्यांच्या आवडत्या मोटरसायकलच्या अधिक जवळ आणणे आणि अनेक दिवसांपासून पाहत असलेली बाईक खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या प्रत्येक ब्रँडची स्वतःची वेगळी ओळख आणि रायडर्सशी भावनिक नाते आहे. या मोटरसायकलचे आकर्षण आणि त्यांचे वैशिष्ट्य कायम ठेवत, त्या स्वतःच्या मालकीच्या करण्याच्या दिशेने पहिले पाऊल अधिक सोपे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या दिवाळीत जावा, येझदी किंवा बीएसए मोटरसायकल खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. तुमच्या जवळच्या अधिकृत जावा येझदी मोटरसायकल्स डीलरशिपला भेट द्या, मोटरसायकलची टेस्ट राइड घ्या, आकर्षक सणासुदीच्या फायनान्स ऑफर्सची माहिती जाणून घ्या आणि तुमची स्वप्नातील मोटरसायकल जिंकण्याची संधी मिळवा.
वेस्पा Vibe स्कूटर भारतात लाँच; 125cc आणि 150cc इंजिनसह मिळणार भरपूर नवे फीचर्स! पाहा आत्ताच
Ans: ग्राहकांसाठी 'टेस्ट राइड घ्या आणि तुमची स्वप्नातील बाईक जिंका' ही विशेष स्पर्धात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Ans: प्रति लाख रुपयांमागे केवळ १,८८८ रुपयांपासून सुरू होणारा ईएमआय, ४.७५% पासून व्याजदर आणि अवघ्या ४,९९९ रुपयांपासून डाऊन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.
Ans: ग्राहकांनी आपल्या जवळच्या अधिकृत जावा-येझदी-बीएसए डीलरशिपला भेट देऊन टेस्ट राइड घेणे आणि ऑफर्सची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.