Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेस्पा Vibe स्कूटर भारतात लाँच; 125cc आणि 150cc इंजिनसह मिळणार भरपूर नवे फीचर्स! पाहा आत्ताच

वेस्पाने 125cc आणि 150cc इंजिनसह नवीन Vibe स्कूटर लाँच केला आहे. 12-इंच व्हील आणि 5-इंच TFT डिस्प्ले असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत किती आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 03, 2026 | 03:53 PM
वेस्पा Vibe स्कूटर भारतात लाँच; 125cc आणि 150cc इंजिनसह मिळणार भरपूर नवे फीचर्स! पाहा आत्ताच
Follow Us
Follow Us:
  • वेस्पा Vibe 125 ची किंमत 1,65,500 रुपये, तर Vibe 150 ची किंमत 1,78,000 रुपये आहे.
  • दोन्ही बाजूंना 12-इंच अलॉय व्हील आणि 5-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • Vibe 125 मध्ये 124cc, तर Vibe 150 मध्ये 149.5cc एअर-कूल्ड इंजिन मिळते.
वेस्पाने इंडियन मार्केटमध्ये आपला नवीन Vespa Vibe स्कूटर 125cc आणि 150cc अशा 2 इंजिन ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. नवीन डिझाइन, 12-इंच अलॉय व्हील आणि 5-इंच TFT डिस्प्ले यामुळे हा स्कूटर चर्चेत आला आहे. डीलर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.65 लाख रुपये आहे.

किंमत आणि व्हेरिएंट

वेस्पा Vibe 125 ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1,65,500 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Vibe 150 साठी 1,78,000 रुपये मोजावे लागतील. कमी इंजिन कॅपसिटी आणि तुलनेने कमी किंमत हवी असलेल्या कस्टमर्ससाठी 125cc व्हेरिएंटचा विचार करता येईल. जास्त पॉवर आणि ABS हवे असल्यास 150cc व्हेरिएंटचा ऑप्शन मिळतो.

डिझाइनमध्ये काय बदल झाले?

नवीन Vibe मध्ये स्पोर्टी अलॉय व्हील, फ्रंट एप्रनवर सेंट्रल ट्रिम आणि साइड पॅनलवर मोठी Vespa ब्रँडिंग देण्यात आली आहे. रिम स्टिकर्समुळे स्कूटरला वेगळा लूक मिळतो. स्टँडर्ड 125 आणि 150 मॉडेलमध्ये Azzurro Provenza आणि Pearl White हे कलर मिळतात. तर Vespa S Vibe मध्ये Rosso Red आणि Matte Black रंगांचे ऑप्शन आहेत.

BMW ची सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात पेटंट! थांबल्यावरही पडणार नाही, रायडरसाठी खास केज डिझाइन

दोन्ही बाजूंना 12-इंच व्हील

या स्कूटरमधील महत्त्वाचा बदल म्हणजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंना 12-इंच व्हील देण्यात आले आहेत. जुन्या सेटअपमध्ये पुढे 11-इंच आणि मागे 10-इंच व्हील मिळत होते. नवीन सेटअपमुळे स्कूटरचा लूक बदलला आहे.

5-इंच TFT डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी

Vespa Vibe मध्ये 5-इंच TFT कन्सोल देण्यात आले आहे. यामध्ये Bluetooth कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कॉल-एसएमएस अलर्ट मिळतात. त्यामुळे रायडिंगदरम्यान स्मार्टफोनशी रिलेटेड काही सुविधा थेट डिस्प्लेवर वापरता येतात.

125cc आणि 150cc इंजिनची माहिती

Vibe 125 मध्ये 124cc एअर-कूल्ड इंजिन असून ते 9.5 PS पॉवर आणि 10.1 Nm टॉर्क देते. तर Vibe 150 मध्ये 149.5cc एअर-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 11.42 PS पॉवर आणि 11.66 Nm टॉर्क जनरेट करते. सुरक्षेसाठी 150 आणि 150 S व्हेरिएंटमध्ये सिंगल-चॅनेल ABS देण्यात आले आहे. त्यामुळे कस्टमर्सना किंमत, पॉवर आणि सेफ्टीच्या गरजेनुसार व्हेरिएंट निवडता येईल.

बजेट 1 लाखांचं? मग ही इलेक्ट्रिक स्कूटर पाहाच! e-SPRINTO G1 मधील हे भन्नाट फीचर्स जाणून घ्या

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: वेस्पा Vibe स्कूटरची किंमत किती आहे?

उत्तर: वेस्पा Vibe 125 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1,65,500 रुपये आणि Vibe 150 ची किंमत 1,78,000 रुपये आहे.

प्रश्न 2: Vespa Vibe मध्ये कोणते इंजिन ऑप्शन मिळतात?

उत्तर: या स्कूटरमध्ये 124cc आणि 149.5cc एअर-कूल्ड इंजिनचे ऑप्शन मिळतात.

प्रश्न 3: Vespa Vibe मध्ये कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत?

उत्तर: यात 5-इंच TFT डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कॉल-एसएमएस अलर्ट मिळतात.

Web Title: Vespa vibe scooter launched india price features engine auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

दिवाळीत फक्त 4.69 लाखांत इलेक्ट्रिक कार घरी आणा! 315 KM रेंजसह 4 EV वर BaaS ऑफर
1

दिवाळीत फक्त 4.69 लाखांत इलेक्ट्रिक कार घरी आणा! 315 KM रेंजसह 4 EV वर BaaS ऑफर

हार्ले-डेव्हिडसनची नवीन स्प्रिंट 440 क्रूझर बाइक सादर; लवकरच भारतात होणार लाँच! पाहा काय असेल खास
2

हार्ले-डेव्हिडसनची नवीन स्प्रिंट 440 क्रूझर बाइक सादर; लवकरच भारतात होणार लाँच! पाहा काय असेल खास

कियाची ऑक्टोबरमध्ये रेकॉर्डतोड विक्री! 33,462 कार्सची विक्री, सलग दुसऱ्या महिन्यात नवा रेकॉर्ड
3

कियाची ऑक्टोबरमध्ये रेकॉर्डतोड विक्री! 33,462 कार्सची विक्री, सलग दुसऱ्या महिन्यात नवा रेकॉर्ड

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये तुफान विक्री! 2.76 लाख कार्सची विक्री, एक्स्पोर्टमध्ये 59% वाढ
4

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्ये तुफान विक्री! 2.76 लाख कार्सची विक्री, एक्स्पोर्टमध्ये 59% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.