Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कशी ग्राहकांनी थट्टा मांडली ! February 2025 मध्ये फक्त 12 लोकांनी खरेदी केली ‘ही’ SUV, 5 महिन्यात शून्य विक्री

भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात एसयूव्हींची विक्री होत असते. पण एक अशी देखील एसयूव्ही नजरेत आली आहे, जिच्या विक्रीला उतरती कळा लागली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2025 | 08:07 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कार विकल्या जातात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सला ग्राहक अधिक प्राधान्य देत असतात. एसयूव्हीबद्दलची हीच मागणी पाहता, अनेक कार उत्पादक कंपन्या देशात उत्तम एसयूव्ही ऑफर करत आहे. यातील काही एसयूव्ही तर विक्रीचे नवीन टप्पे गाठत आहे. पण मार्केटमध्ये सर्वच एसयूव्हीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय असेही नाही. आज आपण अशाच एका एसयूव्हीबद्दल जाणून घेणार आहोत, जिची विक्री अनेक महिन्यांपासून ढासळत आहे.

येत्या 6 महिन्यात EV च्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीस येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Jeep Grand Cherokee ची विक्री ढासळली

भारतीय बाजारात Jeep India एकूण 4 मॉडेल्स विकत आहे. कंपनीचे सर्व मॉडेल्स प्रीमियम आणि लक्झरी आहेत, ज्यामुळे त्याची विक्री खूपच कमी आहे. परंतु, कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये गेल्या 6 महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात कमी विक्री नोंदवली आहे. जीप ग्रँड चेरोकी ही कंपनीच्या विक्री यादीत सर्वात कमी विकली जाणारी कार आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत या कारला फक्त 12 ग्राहकांनी खरेदी केले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत या कारचे एकही युनिट विकले गेले नाही. कंपनी आपली विक्री वाढवण्यासाठी सतत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना डिस्काउंट देत ​​असते. या महिन्यातही कंपनीच्या कारवर 3 लाख रुपयांची सूट मिळत आहे. याची एक्स-शोरूम किंमत 67.50 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.

HSRP: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Jeep Grand Cherokee फीचर्स, डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स

जुन्या मॉडेलपेक्षा या कारमध्ये अधिक शार्प डिझाइन मिळते, ज्यामध्ये स्लिम हेडलाइट्स आणि टेललाइट्स आहेत. जीपची सिग्नेचर 7-स्लॅट ग्रिल आणि ‘जीप’ लोगो कारच्या पुढच्या भागात दिसतो. चौकोनी बॉडी क्लॅडिंग आणि 20-इंच आणि मेटॅलिक अलॉय व्हील्स ग्रँड या कारला एक जबरदस्त आकर्षणाचे केंद्र बनवते. मागील बाजूस, त्याला स्लिम एलईडी टेल लाईट्स आणि क्रोम सराउंडसह मागील विंडशील्ड मिळते.

या एसयूव्हीमध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 270 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. ऑफरोडिंगसाठी, ही कार भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सर्व एसयूव्हींना मागे टाकते. याचा ग्राउंड क्लीयरन्स 215 मिमी आहे, ज्यामुळे ग्रँड चेरोकी 533 मिमी खोल पाण्यात देखील धावू शकते. जीप ग्रँड चेरोकी सिंगल व्हेरियंट आणि 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 10.25 -इंचाच्या फ्रंट को-पॅसेंजर टचस्क्रीन डिस्प्लेसह क्लास-लीडिंग टेक्नोलॉजी देते. याशिवाय, यात 10.25 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10-इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि 10.1-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये पहिल्या रांगेत बसलेल्यांसाठी, यात 10-इंचाचा 4K डिस्प्ले आहे. ज्याची बूट स्पेस 1076-लिटर आहे.

Web Title: Jeep grand cherokee sales in february 2025 only 12 people purchased this car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • automobile
  • Jeep India
  • record sales

संबंधित बातम्या

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
1

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
2

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…
3

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
4

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.