फोटो सौजन्य: iStock
भारतात दुचाकींच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यात बाईकपेक्षा स्कूटरला जास्त मागणी मिळताना दिसते. बाईकच्या तुलनेत स्कूटर ही चालवण्यास सोपी आणि सोयीस्कर असते. तसेच, रहदारीच्या वेळेत स्कूटर आरामात चालवता येते. अशातच आज आपण अशा एका स्कूटरबद्दल जाणून घेऊयात, जिने Jupiter, Access आणि Chetak सारख्या स्कूटरला मात दिली आहे.
जून 2025 मध्ये देशात कोणत्या स्कूटर्सना सर्वाधिक मागणी होती याची यादी समोर आली आहे. गेल्या महिन्यातही, दरवर्षीप्रमाणे, Honda Activa ने बाजी मारली आहे. त्याला 1.83 लाखांहून अधिक ग्राहक मिळाले. त्याच वेळी, टीव्हीएस ज्युपिटरलाही एक लाखांहून अधिक ग्राहक मिळाले. याशिवाय, सर्व स्कूटर्सची विक्री खूपच कमी राहिली आहे. चला जाणून घेऊयात जून 2025 मध्ये कोणत्या मॉडेलचे किती स्कूटर विकले गेले आहे.
जून 2025 मध्ये होंडा अॅक्टिव्हाने 1,83,265 युनिट्स विकले आहे. तर जून 2024 मध्ये ही संख्या 2,33,376 युनिट्स इतकी होती. यानुसार अॅक्टिव्हाच्या वार्षिक विक्रीत 21.47% घट झाली.
Honda CB125 Hornet भारतात सादर, पॉवरफुल इंजिनसह मिळणार पॉवरफुल परफॉर्मन्स
जून 2025 मध्ये टीव्हीएस ज्युपिटरने 1,07,980 युनिट्स विकल्या आहे. तर जून 2024 मध्ये 72,100 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 35,880 युनिट्स जास्त विकल्या गेल्या आणि त्यात वार्षिक 49.76% वाढ झाली. याच कालावधीत सुझुकी अॅक्सेसने 51,555 युनिट्स विकल्या. तर जून 2024 मध्ये 52,192 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 637 युनिट्स कमी विकल्या गेल्या आणि त्यात वार्षिक 1.22% घट झाली.
जून 2025 मध्ये होंडा डिओच्या 24,278 युनिट्स विकल्या गेल्या. तर जून 2024 मध्ये 32,584 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच या स्कूटरचे 8,306 युनिट्स कमी विकल्या गेले आणि त्यात वार्षिक 25.49% घट झाली. याच कालावधीत टीव्हीएस एनटॉर्कच्या 22,822 युनिट्स विकले गेले. तर जून 2024 मध्ये 27,812 युनिट्स विकले गेले. म्हणजेच 4,990 युनिट्स कमी विकले गेले आहेत आणि त्यात वार्षिक 17.94% घट झाली. तर बजाज चेतकचे 17,864 युनिट्स विकले आहेत. तर जून 2024 मध्ये 16,691 युनिट्स विकल्या गेल्या. यानुसार याच्या वार्षिक विक्रीत 7.03% वाढ झाली.
पेट्रोलचं नो टेन्शन! 60 हजारांहून कमी किमतीत मिळतात या 5 ई-स्कूटर, एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स
जून 2025 मध्ये Ola S1 च्या 20,190 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर जून 2024 मध्ये 36,859 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 16,669 युनिट्स कमी विकल्या गेल्या आणि त्यात वार्षिक 45.22% घट झाली. अशाप्रकारे, जून 2025 मध्ये या टॉप-10 मॉडेल्सच्या एकूण 4,72,205 युनिट्स विकल्या गेल्या. तर जून 2024 मध्ये हा आकडा 5,17,126 युनिट्स होता. म्हणजेच 44,921 युनिट्स कमी विकल्या गेल्या आणि त्यात वार्षिक 8.69% घट झाली.