फोटो सौजन्य: iStock
भारतात जरी बजेट फ्रेंडली बाईक मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्या तरी आजही स्पोर्ट बाईकची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही आहे. अनेक तरुणांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे स्पोर्ट बाईक असावी. अनेक सेलिब्रेटी मंडळी सुद्धा विविध स्पोर्ट बाईक आपल्या बाईक कलेक्शनमध्ये ठेवत असतात.
भारतात उत्तम स्पोर्ट बाईक उत्पादक कंपन्या आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे कावासाकी. कावासाकीने देशात अनेक हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर केल्या आहेत. आता कंपनी आपल्या एका दमदार बाईकवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे.
जर तुम्ही एक पॉवरफुल स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अँझेन कावासाकी डीलरशिप (अँझेन कावासाकी, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) त्यांच्या ग्राहकांना Kawasaki Ninja 300 वर 43,000 रुपयांचे मोठे डिस्काउंट देत आहे. या ऑफर अंतर्गत, बाईकची ऑन-रोड किंमत 3.60 लाख रुपये असेल, जी त्याच्या वास्तविक किमतीपेक्षा खूपच कमी आहे. ही ऑफर फक्त मार्च 2025 च्या अखेरपर्यंत वैध असेल. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कावासाकी निंजा 300 ही भारतातील कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात जास्त काळ चालणारी बाईक आहे.
या डिस्काउंटनंतर, ही मुंबईतील दुसरी सर्वात परवडणारी ट्विन-सिलेंडर बाईक बनली आहे. ही बाईक भारतात CKD (Completely Knocked Down) मार्गाने आणली जाते, ज्यामुळे याची किंमत इतर आयात केलेल्या बाईकपेक्षा कमी असते.
या बाईकच्या इंजिन आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 296 सीसी, पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 38.88 bhp पॉवर आणि 26.1 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते.
हार्डवेअर आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन आहे. यासोबतच, यात 17-इंच अलॉय व्हील्स, ड्युअल डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखे सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
भर उन्हात कार होतेय Overheat? इंजिनला थंड ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स
भारतात, कावासाकी निंजा 300 तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे लाईम ग्रीन, कँडी लाईम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
ही बाईक KTM RC 390, Yamaha R3 आणि Aprilia RS 457 सारख्या स्पोर्ट्स बाईक्सशी थेट स्पर्धा करते.