Kawasaki Eliminator 400 चा नवा स्पेशल एडिशन लाँच (फोटो सौजन्य: @AcHirabari/X.com)
कावासाकी आपल्या स्टायलिश लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकसाठी ओळखली जाते. कंपनीच्या बाईकचा जगभरात एक वेगळा चाहता वर्ग पाहायला मिळतो. अनेकांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे कावासाकीच्या बाईक असाव्यात. भारतासह इतर देशात सुद्धा कावासाकीच्या बाईक लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या बाईकचा स्पेशल एडिशन जपानमध्ये लाँच केला आहे.
कावासाकीने जपानी बाजारात त्यांच्या कावासाकी एलिमिनेटर 400 चा स्पेशल एडिशन लाँच केला आहे. या बाईकला ‘प्लाझा एडिशन’ असे म्हटले जात आहे, जी चांगल्या डिझाइन आणि काही उत्तम फीचर्ससह आणली गेली आहे. चला जाणून घेऊया एलिमिनेटर 400 प्लाझा एडिशन कोणत्या खास फीचर्ससह सादर करण्यात आली आहे?
नवीन Kawasaki Ninja ZX-10R भारतात लाँच, किंमत वाढली मात्र परफॉर्मन्स…
कावासाकी एलिमिनेटर 400 प्लाझा एडिशन नवीन रंगाच्या मरून आणि ब्लॅक रंगाच्या स्कीममध्ये सादर करण्यात आली आहे. यात काही फीचर्स दिले आहेत जी सहसा बाईकमध्ये दिसून येत नाहीत. कावासाकीने या बाईकच्या हँडलबारवर यूएसबी-सी चार्जिंग सॉकेट आणि जीपीएस-सक्षम ड्युअल कॅमेरा सिस्टम प्रदान केली आहे, जी रायडींग दरम्यान रस्त्याचे रेकॉर्डिंग करते.
कावासाकी एलिमिनेटर 400 मध्ये 451cc पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे 44.7bhp इतकी पॉवर आणि 42.6Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनला सहा-स्पीड गिअरबॉक्सची जोड मिळाली आहे. हे इंजिन खूपच फ्री-रेविंग आणि स्पोर्टी स्वरूपाचे आहे, जे पारंपरिक क्रूझर बाईक्सच्या हळू-रेविंग आणि जास्त टॉर्क निर्माण करणाऱ्या इंजिनांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
कावासाकी एलिमिनेटर 400 मध्ये ट्रेलिस फ्रेम आहे, जी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रिअर शॉक सस्पेंशनवर बनवली आहे. यात ब्रेकिंगसाठी ABS सह सिंगल 310 मिमी फ्रंट डिस्क आणि 240 मिमी रिअर डिस्क आहे. मोटरसायकलमध्ये LED लाईट्स, ABS, राइड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी फीचर्स आहेत.
एलिमिनेटर ही कावासाकीची भारतीय बाजारात विकली जाणारी एकमेव क्रूझर बाईक आहे. याचे रेक-आउट फ्रंट एंड, लो-स्लंग स्टॅन्स आणि फ्लॅट हँडलबार या बाईकला क्लासिक क्रूझर लूक देतात. मात्र, भारतीय ऑटो बाजारात ती फक्त ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.