
किया इंडिया देशातील लोकप्रिय कंपनी
ऑल-न्यू किया सेल्टोसच्या उत्पादनाला सुरूवात होणार
२ जानेवारी २०२६ रोजी किंमत जाहीर होणार
Automobile News: किया इंडिया देशातील एक लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी किया इंडिया सातत्याने नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारात सादर करत असते. किया इंडिया मिड-एसयूव्ही श्रेणीमधील नवीन मॉडेल लॉंच करणार आहे. किया इंडिया २ जानेवारी २०२६ रोजी ऑल-न्यू किया सेल्टोसच्या किमतींची घोषणा करणार आहे. तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवी सेल्टोस भारतातील सर्वात लोकप्रिय व मापदंड स्थापित करणाऱ्या मिड-एसयूव्हीच्या अधिक मोठी, अधिक आकर्षक आणि प्रगतीशील जनरेशनल उत्क्रांतीला सादर करते. भारतातील एसयूव्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन सेल्टोसमध्ये एैसपैस जागा, आकर्षक नवीन डिझाइन, अधिक राइड आरामदायीपणा, आत्मविश्वासपूर्ण हाताळणी, प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि नेक्स्ट-जनरेशन डिजिटल तंत्रज्ञान आहे, जेथे जागतिक मानकांसह भारतातील रस्ते व जीवनशैलीसाठी डिझाइन करण्यात आलेले सोल्यूशन्स आहेत.
”ऑल-न्यू किया सेल्टोसचे लाँच किया इंडियासाठी अभिमानास्पद टप्पा आहे. सेल्टोसने दीर्घकाळापासून मिड-एसयूव्ही श्रेणीसाठी मापदंड स्थापित केले आहेत आणि ही न्यू जनरेशन अधिक मोठी, अधिक आकर्षक व अधिक प्रगतीशील उत्क्रांतीला सादर करते, जी भारतातील ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायानुसार डिझाइन करण्यात आली आहे. आमच्या अनंतपूर प्लांटमध्ये उत्पादनाला सुरूवात होण्यासह आमच्या टीम्स ग्राहक अधिक वाट न पाहता वेळेवर त्यांच्या ऑल-न्यू सेल्टोसची डिलिव्हरी घेऊ शकण्याची खात्री घेण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. आम्हाला विश्वास आहे की, ऑल-न्यू सेल्टोस पुन्हा एकदा श्रेणीमधील अपेक्षांची पूर्तता करेल आणि भारतात कियाचे नेतृत्व अधिक प्रबळ करेल,” असे किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वांगू ली म्हणाले, जे या महत्त्वपूर्ण टप्प्याला साजरे करण्यासाठी अनंतपूरमध्ये उपस्थित होते. ”नवीन सेल्टोसचा लूक अधिक आकर्षक आहे. अनंतपूर प्लांटमधील टीमने आमच्या पुरवठादार सहयोगींसोबत सहयोगाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, जेथे ग्राहकांना प्रभावी कार्यक्षमता व कनेक्टीव्हीटीसह आकर्षक लुक, अधिक मोठी डिझाइन, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगतीशील आणि सुरक्षित वेईकल मिळेल,” असे ते पुढे म्हणाले.
अनंतपूर प्लांट कियाचे भारतातील पहिले उत्पादन प्लांट व प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र आहे. २०१९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या या प्लांटमध्ये पहिल्यांदा किया सेल्टोस उत्पादित करण्यात आली होती. हे मॉडेल विशेषत: भारतातील ग्राहकांसाठी संकल्पित व डिझाइन करण्यात आले होते. देशांतर्गत मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या प्लांटमध्ये प्रगत ऑटोमेशन, उच्च दर्जाचे मानक आणि कुशल कर्मचारीवर्ग आहेत. स्थापनेपासून या प्लांटने कियाच्या जागतिक धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यासह सेल्टोस भारतासाठी प्रमुख मॉडेल बनण्यासह कियाच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये मोठी योगदानकर्ता देखील ठरली आहे.
ऑल-न्यू किया सेल्टोस प्रबळ वारसा आणि पूर्वीच्या मॉडेलला ग्राहकांकडून मिळालेल्या विश्वासाच्या आधारावर डिझाइन करण्यात आली आहे, तसेच कियाचे मुलभूत उत्पादन आधारस्तंभ लक्षवेधक उपस्थिती, आकर्षक डिझाइन आणि प्रगतीशील सुरक्षितता व तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जाते. भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षा लक्षात घेत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेली ही एसयूव्ही आकाराने अधिक मोठी आहे, लांबी ४,४६० मिमी आहे, जी श्रेणीमध्ये सर्वात लांब आहे आणि रूंदी १,८३० मिमी आहे. २,६९० मिमी लांब व्हीलबेस केबिनमध्ये अधिक जागेची आणि ड्रायव्हिंग स्थिरतेची खात्री देते, ज्यासह प्रत्येक प्रवास आत्मविश्वासपूर्ण, आरामदायी व प्रीमियम होण्याची खात्री मिळते.
अधिक आकर्षक असलेली ही एसयूव्ही ग्राहकांना अधिक लक्षवेधक व अधिक प्रगतीशील एसयूव्ही डिझाइन देते, जी कियाच्या ऑपोझिट्स युनायटेड तत्त्वाशी संलग्न आहे, ज्यासह या वेईकलची आकर्षकता व प्रीमियम अपील अधिक लक्षवेधक बनले आहे. या वेईकलमध्ये नवीन डिजिटल टायगर फेस, आइस क्यूब एलईडी प्राजेक्शन हेल्डलॅम्प्ससह डायनॅमिक वेलकम फंक्शन, स्पोर्टी क्रिस्टल कट अलॉई व्हील्ससह निऑन ब्रेक कॅलिपर्स, शक्तिशाली व समकालीन सिल्हूट अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, ज्यासह ऑल-न्यू सेल्टोस रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते.