फोटो सौजन्य: @designboom (X.com)
पूर्वी मार्केटमध्ये फक्त इंधनावर चालणाऱ्या कार्स पाहायला मिळत होत्या. पुढे जसजसा काळ बदलत गेला तसतसा मार्केटमध्ये अनेक आधुनिक कार्स लाँच होत गेल्या. आता तर इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, कारच्या प्रकारासोबतच त्याच्या डिझाइनमध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहे.
ऑटोमोबाईल्सच्या जगात सतत नवीन बदल दिसून येत आहेत. आता पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन सारख्या पर्यावरणपूरक पर्यायांवरही वेगाने काम केले जात आहे. 2 सीटर ते 10 सीटर पर्यंतच्या कार बाजारात उपलब्ध आहेत, परंतु अलीकडेच इंटरनेटवर एक अशी कार व्हायरल झाली आहे, जी यापूर्वी क्वचितच कोणी पाहिली किंवा ऐकली असेल. ही जगातील सर्वात पातळ कार आहे. या कारची रुंदी फक्त १९ इंच आहे.
Donald Trump च्या टॅरिफचा Nissan ला फटका ! कॅनडात मध्ये बंद करावे लागले 3 मॉडेल्स
या अनोख्या पातळ कारचे नाव ‘पांडा’ आहे. ती हलक्या निळ्या रंगाची आहे आणि जवळजवळ 2D कार्टूनसारखी दिसते. कारच्या समोर फक्त एकच हेडलाइट आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला लहान इंडिकेटर लाईट्स आहेत. त्याची क्षमता देखील खूप मर्यादित आहे. चला या अनोख्या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
dubbed world’s narrowest fiat panda drives around as a fully functional and single-seater electric car made with reused components https://t.co/DwckvoBudX pic.twitter.com/bK8HqbjWF4
— designboom (@designboom) July 4, 2025
पांडा कारची रुंदी फक्त 19 इंच आहे, जी सामान्य गादीइतकी आहे. या कारचे डिझाइन इतके पातळ आहे की पहिल्या नजरेतच ही कार 2D कार्टूनचा भाग दिसते. पुढच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये फक्त एकच हेडलाइट आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला लहान इंडिकेटर लाईट्स बसवले आहेत. याची पातळ बॉडी या कारला जगातील इतर कोणत्याही कारपेक्षा वेगळं बनवते.
या कारमध्ये फक्त एकच दरवाजा आहे (ड्रायव्हरच्या बाजूला), म्हणजे जर एखाद्याला मागच्या सीटवर बसायचे असेल तर त्याला पाहिलं पुढच्या सीटवरून आत जावे लागेल. ड्रायव्हिंग सीटच्या समोर एक काळी फियाट स्टीअरिंग व्हील देण्यात आली आहे, ज्यामुळे ती थोडी प्रोफेशनल फील देते. कारमध्ये वाइंड-डाउन खिडक्या आहेत, म्हणजेच हँडलने खिडकी खाली करता येते.
स्टाइल सोबतच मिळेल जबरदस्त सेफ्टी ! फक्त 1.5 लाखात मिळताय ‘या’ 5 दमदार बाईक्स
ही कार विक्रीसाठी बनवली जात नसून तिचा उद्देश फक्त लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि डिझाइनबद्दल नवीन विचार सुरू करणे आहे. हा एक प्रयोग आहे, जे कारचे डिझाइन किती अद्वितीय बनवू शकतो हे दर्शविते.
ही कार ना वाहतूक समस्या सोडवते ना पार्किंगमध्ये मदत करते. परंतु हे निश्चितपणे दर्शवते की एक अतिशय लहान कार देखील लोकांना चकित करू शकते.