फोटो सौजन्य: iStock
जगभरातातील ऑटो बाजार दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज नवनवीन कार त्यातही इलेक्ट्रिक कार्सची लाँचिंग होत आहे. मात्र, अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कर लादल्यामुळे अनेक ऑटो ब्रॅंड्सच्या विक्रीवर परिणाम होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 25% ऑटो टॅरिफचा परिणाम आता जगभरातील ऑटो ब्रँड्सवर दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जपानी कंपनी निसान मोटरने नुकताच घेतलेला निर्णय. निसानने सध्या कॅनडामधील त्यांच्या तीन लोकप्रिय मॉडेल्सचे उत्पादन थांबवले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅरिफवरून वाद सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या ऑटो उद्योगावर परिणाम होताना दिसत आहे.
फुल्ल टॅंकवर 500 KM रेंज ! 15 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीच्याही बजेटमध्ये बसेल ‘ही’ बाईक
निसानने बुधवारी रात्री पुष्टी केली की त्यांनी कॅनडामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रमुख मॉडेल्स असलेल्या Pathfinder आणि Murano SUVs तसेच Frontier पिकअप ट्रकचे उत्पादन अमेरिकेत तात्पुरते थांबवले आहे.
कंपनीने हा निर्णय कधीपासून लागू झाला आणि ही बंदी किती काळ टिकेल हे स्पष्ट केले नाही. कंपनीने आपल्या निवेदनात ते “शॉर्ट-टर्म आणि टेम्पररी” असल्याचे वर्णन केले आहे आणि अमेरिका आणि कॅनेडियन सरकारांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे.
हा निर्णय एप्रिल 2025 मध्ये सुरू झाला, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या कार आणि हलक्या ट्रकवर 25% कर (टॅरिफ) लादला. याचेच उत्तर देण्यासाठी कॅनडानेही कर वाढवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली. याचा परिणाम असा झाला की कंपन्यांना अमेरिकेत बनवलेली वाहने कॅनडाला पाठवणे महाग झाले.
निसानची Scrambler लाइन अमेरिकेतील टेनेसी आणि मिसिसिपी प्लांटमध्ये तयार केली जाते, परंतु आता कंपनी कॅनडासाठी मेक्सिको आणि जपानमधून वाहने आयात करत आहे, जेणेकरून खर्च कमी राहील.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये Bentley चा समावेश
निसानची कॅनडामध्ये सर्वाधिक विक्री होणारी वाहने – Versa, Sentra आणि Rogue – आधीच जपान आणि मेक्सिकोमधून आयात केली गेली आहेत. कंपनीच्या मते, कॅनडामधील त्यांच्या एकूण विक्रीपैकी 80% विक्री या दोन देशांमधून येते.
या टॅरिफ धोरणाचा परिणाम भारतीय कंपनी टाटा मोटर्सवरही झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये, टाटाची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ने अमेरिकेत त्यांच्या कारची शिपमेंट थांबवली. 3 एप्रिल 2025 पासून अमेरिकेतील टॅरिफ लागू झाल्यानंतर, JLR ने स्पष्ट केले की हे पाऊल टॅरिफच्या प्रभावाचे संतुलन साधण्यासाठी त्यांच्या कॉर्पोरेट धोरणाचा एक भाग आहे.