फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात आता हायब्रिड एसयूव्हीची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे अनेक ऑटो कंपन्या हायब्रीड कारच्या उत्पदनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. या पार्श्वभूमीवर, Hyundai आता या सेगमेंटमध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीत दिसत आहे. कंपनी येत्या काही वर्षांत अनेक नवीन हायब्रिड एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये पुढील जनरेशनची ह्युंदाई क्रेटा, एक पूर्णपणे नवीन तीन-रो एसयूव्ही आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय पॅलिसेड यांचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये केवळ पॉवरफुल इंजिन आणि लेटेस्ट डिझाइनच नाही तर हायब्रिड तंत्रज्ञानामुळे वाढलेले मायलेज आणि सुधारित परफॉर्मन्सचे कॉम्बिनेशन देखील असेल. चला या तीन आगामी हायब्रिड मॉडेल्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
वाह काय ऑफर आहे! ‘या’ कंपनीचे Electric Scooter आता फक्त 50,000 रुपयात घरी आणता येणार
ह्युंदाई 2027 पर्यंत त्यांची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही, क्रेटा, नवीन डिझाइन आणि नवीन प्लॅटफॉर्मसह लाँच करणार आहे. ती 1.5-लिटर पेट्रोल, डिझेल आणि टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल. उल्लेखनीय म्हणजे, कंपनी या कारचा हायब्रिड व्हेरिएंट देखील सादर करण्याची योजना आखत आहे. याव्यतिरिक्त, एक अपडेटेड क्रेटा ईव्ही देखील लाँच केली जाईल.
दुसरीकडे, ह्युंदाई 2027 पर्यंत भारतीय बाजारात Ni1i कोडनेम असलेली एक नवीन 3-रो एसयूव्ही सादर करण्याची अपेक्षा आहे. ती अल्काझर आणि टक्सन दरम्यान स्थित असेल. रिपोर्टनुसार यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सेटअप असेल. उत्पादन ह्युंदाईच्या नवीन तळेगाव प्लांटमध्ये होईल.
काय सॉलिड लूक आहे राव! BMW ची ‘ही’ लिमिटेड एडिशन बाईक लाँच, पहिल्यांदाच किंमत 3 लाखांपेक्षा कमी
ह्युंदाई पॅलिसेड भारतात आणण्याचा विचार करत आहे. ही कंपनीच्या सर्वात प्रीमियम एसयूव्हींपैकी एक असेल. यात 2.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे कॉम्बिनेशन असेल, जे 334 बीएचपी आणि 460 एनएम टॉर्क निर्माण करेल. कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही सुमारे 14 किमी/लीटर मायलेज देऊ शकते. 2028 पर्यंत ही कार लाँच होण्याची अपेक्षा आहे.