फोटो सौजन्य: Social Media
सध्या इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच मागणीकडे पाहून अनेक ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कमानी महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये XEV 9e ला लाँच केले होते. आता कंपनीने त्याचे टॉप व्हेरियंटच्या किंमती सुद्धा जाहीर केल्या आहे.
जर तुम्हाला Mahindra XEV 9e खरेदी करायची इच्छा असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर या एसयूव्हीचे बेस व्हेरियंट म्हणजेच Pack One खरेदी करण्यासाठी तुम्ही 5 लाखाचे डाउन पेमेंट केले असेल तर यावर किती ईएमआय द्यावा लागेल, याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेणे महत्वाचे.
यंदाचा Bharat Mobility 2025 गाजवण्यास BYD सज्ज, लाँच करणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार
महिंद्रा XEV 9e चा बेस व्हेरियंट म्हणून पॅक वन ऑफर केले जाते. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा बेस व्हेरियंट 21.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केली तर 21.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह त्यावर विमा आणि टीसीएस शुल्क देखील द्यावे लागेल.
ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला विम्यासाठी 89210 रुपये द्यावे लागतील. टीसीएस शुल्क म्हणून 21900 रुपये द्यावे लागतील. यानंतर, दिल्लीमध्ये कारची ऑन-रोड किंमत 23 लाखांपेक्षा जास्त होईल.
Mahindra XEV 9e चा टॉप व्हेरियंट लाँच, फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
जर तुम्ही महिंद्रा XEV 9e चा बेस व्हेरियंट पॅक वन खरेदी केला तर बँक फक्त याच्या एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज देईल. अशा परिस्थितीत, 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 18,01,110 रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 18,01,110 रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 28978 रुपये ईएमआय भरावा लागेल.
वर नमूद केल्याप्रमाणे, जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 18,01,110 रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 28978 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला महिंद्रा XEV 9e च्या पॅक वन व्हेरियंटसाठी सुमारे 6.33 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 29.34 लाख रुपये होईल.
टाटा मोटर्स लवकरच Tata Sierra EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार लाँच होताच Mahindra XEV 9e ला टक्कर देऊ शकते.